आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपक्रम:संसरीत उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर ग्रामपंचायतीची दंडात्मक कारवाई

देवळाली कॅम्प2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

संसरी गावात उघड्यावर कचरा टाकणाऱ्या नागरिकांविरोधात ग्रामपंचायतीने दंडात्मक कारवाई सुरू केली असून तीन दिवसांत सात हजार रुपयांचा दंड वसूल केल्याचे उपसरपंच शेखर गोडसे यांनी सांगितले.केंद्र सरकार व राज्य शासनाच्या निदर्शनानुसार स्वच्छता ही सेवा या उपक्रम संसरी गावात ग्रामपंचायतीच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे.

एसव्हीकेटी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय मेधणे यांच्यासह शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, गट विकास अधिकारी सारिका बारी यांच्या समन्वयातून गावात महाश्रमदानातून स्वच्छता मोहीम राबवून परिसर स्वच्छ करण्यात आला. उघड्यावर कचरा टाकू नये, नियमित घंटागाडीत कचरा टाकावा, नदीपात्र स्वच्छ ठेवावे, परिसरात कचरा टाकू नये अन्यथा कारवाई करण्यात येईल, असा इशारा गावातून दाेनदा फेरी काढून देतानाच ‘स्वच्छ संसरी, सुंदर संसरी’ असा संकल्प करून उपक्रम राबविण्यात आला.

तरीही नागरिकांनी नियमांचे पालन न करता उघड्यावर कचरा टाकून अस्वच्छता पसरवली. त्यामुळे ग्रामविकास अधिकारी अरुण आहेर यांनी १२ जणांविरोधात कारवाई करत तीन दिवसांत सात हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. तसेच गावात स्वच्छता ठेवण्याचे आवाहन सरपंच विनोद गोडसे, उपसरपंच शेखर गोडसे व नागरिकांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...