आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागेल्या अनेक वर्षांपासून काेट्यवधी रुपये खर्च करूनही गाेदावरी प्रदूषणमुक्तीचा प्रश्न सुटत नसल्याचे बघून या समस्येच्या मुळाशी जात १९ सर्वाधिक प्रदूषित नाल्यांपैकी पायलट प्रोजेक्ट म्हणून पाच नाल्यांची शुद्धीकरण मोहीम पुढील महिन्यापासून हाती घेतली जाणार आहे. आयआयटी पवईने दिलेल्या प्राथमिक अहवालातील ‘इन-सीटू’ तंत्रज्ञानानुसार सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाणार असून नदीला नाला मिळण्यापूर्वीच पाणी शुद्ध करण्याची धडपड आहे. गाेदावरीचे प्रदूषण कमी करण्यासाठी काेट्यवधी रुपये खर्च करूनही उपयाेग झालेला नाही. भाजपाची पालिकेत सत्ता असताना केंद्र शासनाच्या ‘नमामि गंगा’ या याेजनेच्या धर्तीवर ‘नमामि गाेदा’ याेजना राबवण्यासाठी प्रस्ताव तयार केला. त्यासाठी केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाकडे पाठपुरावा केला गेला. त्यातून १८२३ काेटीचा प्रस्ताव तयार केला आहे. त्यासाठी डीपीआर करण्याकरिता सल्लागार नियुक्तीची प्रक्रिया नुकतीच पूर्ण झाली. दरम्यान, तात्काळ दिलासा म्हणून मुंबईतील मिठी नदीच्या धर्तीवर गोदावरीत मिसळणाऱ्या नाल्यांचा प्रश्न हाती घेतला आहेत.
उपनद्यांद्वारे समाविष्ट हाेणारे १९ नाले माेठी भूमिका बजावत असल्याचे समाेर आले. ही बाब लक्षात घेत आयआयटी पवई या संस्थेच्या शास्त्रज्ञांचे द्विसदस्यीय पथकाने जानेवारी महिन्यात चिखली नाला, कार्बन नाला, चोपडा नाला, मल्हारखाण नाला, बजरंगनाला, भारतनगर, पुणेराेडवरील बजरंगवाडी, फेम चित्रपट गृहामागील नाला, सुंदरनगर, रोकडोबावाडी नाला, चेहडी आदी ठिकाणी असलेल्या १९ नैसर्गिक नाल्याची प्राथमिक पाहणी करून सांडपाण्याचा प्रवाह किती गतिमान आहे, त्यातील घटक आदीचा अभ्यास करून अहवाल तयार केला. त्यानुसार आता अतिप्रदूषित अशा पाच नाल्यांवर पहिल्या टप्प्यात प्रक्रिया केली जाणार आहेे.
असा आहे इन-सीटू तंत्रज्ञान
नदीला नाला मिळण्यापूर्वीच्या दोनशे मीटर अंतरावर स्ट्रक्चर उभे करून पाणी अडवले जाते. या पाण्यावर प्रक्रिया करून ते शुद्ध करून पुन्हानदीत साेडले जाते. हे स्ट्रक्चर उभे करण्यासाठी पालिकेने निविदा काढण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.एप्रील अखेरपर्यंत काम पुर्ण करण्याचा प्रयत्न आहे.
गाेदेला मिळणाऱ्या या ५ नाल्यांवर हाेणार प्रक्रिया
चिखली, डोबी, वाघाडी, विजय-ममता नाला, कार्बन नाला या पाच नैसर्गिक नाल्यांच्या ठिकाणी प्रदूषणमुक्तीकरिता इ न-सीटू प्रक्रियेनुसार सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाणार आहे.
सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाईल
गोदावरीसह उपनद्यांच्या प्रदूषणमुक्तीसाठी उपाययाेजनाकेल्या जात आहे. १९ पैकी पाच नाल्यांवर आयआयटीपवईच्या अहवालातील इन-सीटू तंत्रज्ञानानुसार सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाईल. त्याच्या यशस्वितेनंतरपुढील निर्णय घेऊ. - शिवकुमार वंजारी, शहर अभियंता,
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.