आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाराष्ट्राचे अधिष्ठान आणि वैभव असलेल्या सप्तशृंगी गडावर जलजीवन मिशन अंतर्गत 9 कोटी 23 लाखांच्या नळ पाणी पुरवठा योजनेचे भूमीपूजन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते झाले. गडाच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नसल्याची ग्वाही यावेळी दिली.
सप्तश्रृंगी गड संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे. मोठ्या संख्येने भाविकांचा राप्ताही असतो. त्यामुळेच या ठिकाणी दररोज 75 हजार नागरिक असतील आशा अंदाजाने ही पाणीपुरवठा योजना तयार करण्यात आली असून, यात्रा उत्सवांचाही विचार करण्यात आला आहे.या नवीन पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून अडीच लाख लिटरचा जलकुंभ, दिवसाला २२ लाख लीटर शुद्ध पाणी होईल. असा जलशुद्धीकरणाचा प्रकल्प तयार करण्यात येणार आहे. भवानी पाझर तलावाच्या माध्यमातून येथे काम करण्यात येणार आहे. सिमेंट बंधारा, सुर्यकुंड व गंगा जमुना विहीरिचाही वापर या योजनेसाठी करण्यात येणार आहे. तसेच वीज बिलाची समस्या निर्माण होवू नये यासाठी सोलर प्रणालीचा समावेश या योजनेत करण्यात आला आहे.
या प्रत्येक गाव, वाड्या व पाड्यांना नळाद्वारे पाणी देताना सोलर प्रणालीचा अवलंब करणार अाहोत. असे मंत्री पाटील यांनी सांगितले. यावेळी आमदार नरेंद्र दराडे, नितीन पवार, सरपंच रमेश पवार,उपसरपंच मनिषा गवळी पाणी पुरवठा विभागाचे सदस्य सचिव अभिषेक कृष्णा,अधीक्षक अभियंता सुनंदा नरवाडे, तहसीलदार बंडू कापसे, बाजार समितीचे सभापती धनंजय पवार, संदीप बेनके आदी उपस्थित होते.
28 हजार गावांना नळाद्वारे पाणी
पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, दिवंगत ए. टी. पवार यांच्या मतदारसंघात पाण्यासाठी एकही रुपया कमी पडू देणार नाही. पाणी जात,धर्म व पंथ मानत नाही. त्यामुळे दुरुस्ती करिता अडीच कोटी रुपये मंजूर झालेली पहिली योजना आहे. जलजीवन मिशन योजना राज्यात एक क्रांती घडवून आणणारी योजना आहे.
28 हजार गावांना पाणी पुरवठा
या अंतर्गत महाराष्ट्रात 28 हजार गावांना नळाद्वारे पाणी पोहचविण्यासाठी शासन वचनबद्ध आहे. त्यानुसार डीपीआर तयार करण्यात आले असून पहिल्या टप्यातील कार्यारंभ जुलैपर्यंत दिले जातील. पयर्टन मंत्री आदित्य ठाकरेंच्या माध्यमातून पर्यटन विकासही केला जाईल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.