आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुरोहित एकांकिका स्पर्धा जिल्हास्तरीय होणार:डॉ कलाल पुरोहित एकांकिका स्पर्धेला सुरुवात

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

विद्यार्थ्यां मधील कला क्षेत्रातील सुप्त गुणांचा विकास करण्यासाठी नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने संस्थास्तरावर असलेली कै .वा .श्री . पुरोहित एकांकिका स्पर्धा पुढील वर्षा पासुन संस्थेच्या शाळे व्यतिरिकत इतर शाळांसाठी खुली करण्यात येणार आहे, अशी माहिती नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष डाँ राजेंद्र कलाल यांनी दिली.

नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने 43 व्या कै .वा .श्री . पुरोहित एकांकिका स्पर्धेचे उद्घाटन गुरुवार दि .15 डिसेंबर रोजी सकाळी 9-30 वाजता धामणकर सभागृह पुरुषोत्तम इंग्लिश स्कूल नाशिकरोड येथे झाले त्या प्रसंगी डाँ कलाल बोलत होते . कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सिने नाटय अभिनेता अभिषेक रहाळकर व सिने नाटय बाल कलाकार सृष्टी पगारे उपस्थित होते.

या वेळी व्यासपिठावर संस्थेचे सेक्रेटरी अश्विनीकुमार येवला, कार्यकारी मंडळाचे उपाध्यक्ष मारुती कुलकर्णी, खजिनदार अनिल दहिया जॉईन्ट सेक्रेटरी प्रसाद कुलकर्णी जॉईन्ट सेक्रेटरी मयुर कपाटे कार्यकारी मंडळाचे सदस्य अलका कुलकर्णी पुरुषोत्तम इंग्लिश स्कूल चे शाळा समितीचे अध्यक्ष जयंत मोंढे . पुरोहित यांचे नातू ऋषिकेश पुरोहित, एकांकिका स्पर्धा प्रमुख हेमंत देशपांडेसह प्रमुख राहुल मुळे एकांकिका स्पर्धेचे परीक्षक चित्रपट व नाटय कलाकार किरण राव, नाटय कलाकार जयदीप पवार, नाट्य कलाकार महेंद्र चौधरी कामिनी पवार उपस्थित होते .

कार्यक्रमाचे प्रास्तविक सेक्रेटरी अश्विनीकुमार येवला यांनी केले. तर प्रास्तविकात सेक्रेटरी अश्विनीकुमार येवला म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या कला गुणांन वाव मिळावा या साठी संस्थेमार्फत शहरी व ग्रामिण भागातील शाळांमध्ये विविध स्पर्धा घेत आहे. तसेच शाळा स्तरावर एकांकिका स्पर्धा आयोजित करणारी राज्यातील एकमेव संस्था आहे. या स्पर्धेतून गिरीश ओक सह मोठ्या प्रमाणात कलाकार चित्रपट सृष्टीला मिळाले आहे या स्पर्धेतुन कलाकार निर्माण होत आहे असे सेकेटरी येवला म्हणाले . .

या नंतर पुढील एकांकीका सादर केल्या यात

यात नवीन मराठी शाळा ( प्रायश्चित्त ) . लेट .जय .टिबरेवाला इंग्लीश मिडीयम स्कूल ( चला जगु या मनमोकळे) . श्रीमती र .ज .चौहाण बिटको कन्या विद्यालय ( दुधावरची साय ) . देशमुख महिला महाविद्यालय ( बळीराजाचा बळी) . पुरुषोत्तम इंग्लिश स्कूल ( गुणांच्या सावल्या ) . आरंभ महाविद्यालय ( वाकडे वाडिच भूत ) या एकांकिका सादर केल्या

बातम्या आणखी आहेत...