आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिकमध्ये रामकथेचे आयोजन:श्रीराम जन्माचा उद्देश सत्तमार्ग, जगाच्या कल्याणासाठी; रामायणाचार्य हभप रामराव महाराज ढोक

नाशिक17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय संस्कृतीत वेगवेगळ्या अवतारांचा उद्देश हा वेगवेगळ्या सांगण्यात येतो सांगितला जातो, ज्याप्रमाणे श्रीकृष्णाचा अवतार हा दैत्यांच्या किंवा वाईट प्रवृत्तीच्या नायनाटासाठी सांगण्यात येतो, त्याचप्रमाणे श्रीरामाचा जन्म हा सतमार्ग, आदर्श आचारण, जगाच्या कल्याणासाठी किंबहुना जगासमोर आदर्श ठेवण्यासाठी झालेला आहे, असे प्रतिपादन रामायणाचार्य हभप रामरावजी महाराज ढोक नागपूरकर यांनी केले.

सातपूर येथील श्रमिकनगरच्या श्री तुळजाभवानी मंदिराच्या पटांगणावर भव्य डोम मंडपात रामायणाचार्य हभप रामराव महाराज ढोक नागपूरकर यांच्या श्री रामकथा तथा श्री रामायण कथेला धार्मिक वातावरणात प्रारंभ झाला असून प्रसंगी श्री रामरावजी महाराज ढोक यांनी श्रीरामजन्मोत्सव या विषयावर प्रवचनात कथा निरूपण करत होते.

याप्रसंगी राम जन्मोत्सवाची कथा सांगताना ढोक महाराज म्हणाले की, प्रत्येक अवताराचा जन्म हा वेगवेगळ्या कारणांसाठी झालेला आहे. त्यात श्रीराम जन्माची वेगवेगळी कारणे सांगण्यात येतात. तसेच श्रीराम हे आदर्शाचे प्रतीक मानले जाते. त्याचप्रमाणे शिव विष्णू हे दोन्ही तत्व एकच आहेत, हरि-हर भेद नाही, एक एकाच्या हृदयी गोडी साखरेसम, असे सांगून त्यांनी शिव आणि वैष्णव पंथीयांमध्ये वाद होऊ नये, असे आवाहन केले.

श्री राम कथेच्या आधी शिव कथा येते ही एक कथा श्रवण करणे एक परीक्षा वाटत असली तरी त्यामागे जीवाचे कल्याण हा उद्देश आहे, असेही ते म्हणाले. त्याचप्रमाणे जीवनात परमेश्वर भक्ती महत्त्वाचे आहे, त्यासाठी धर्म आणि पंथ ही एक व्यवस्था आहे. व्यवस्थेचा उपयोग करून तुम्हा- आम्हाला परमार्थ साधायचा आहे असेही ढोक महाराज म्हणाले.

दरम्यान उद्या दि. 13 केवट कथा, दि. 14 सिताहरण, दि. 15 लंका दहन, दि. 16 रावण वध व श्रीराम राज्याभिषेक या कथांचे प्रवचन श्री रामराव महाराज ढोक करणार आहेत. याप्रसंगी निवृत्ती रायते महाराज, निवृत्ती चव्हाण महाराज, भास्कर महाराज, खकाळ महाराज आदि उपस्थित होते.

दि. 10 पासून ते 16 सप्टेंबरपर्यंत दररोज संध्याकाळी सात ते रात्री दहा वाजेपर्यंत रामकथा होणार आहे. कथा समाप्तीनंतर शुक्रवारी (दि. 16) महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

विविध कथा साराचे नाट्यरूपण यावेळी सादर केले जाणार आहे, सातपूरच्या पंचक्रोशीतील नागरिकांनी या कथेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...