आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थ्यांची तयारी सुरू:नाशिकमध्ये शालेय साहित्य खरेदीसाठी पालकांच्या रांगा, पोलिसांच्या दुर्लक्षामुळे वाहतूक कोंडीत भर

नाशिक22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोनाच्या अडीच वर्षानंतर प्रथमच पूर्व प्राथमिक शाळा पासून ते बारावीपर्यंतच्या सर्व सरकारी व खाजगी शाळांच्या शैक्षणिक सत्र येत्या सोमवार पासून सुरू होत आहे. शनिवारी नाशिक शहरात मुख्य बाजारपेठ असलेल्या शालिमार मेनरोड ते रविवार कारंजा परिसर विध्यार्थी व पालकांच्या शालेय साहित्य व गणवेश खरेदीसाठीच्या गर्दीने खच्चून भरले होते. सर्वत्र वाहतूक कोंडी होऊन वाहनाच्य लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

विशेष म्हणजे, या वाहतूक कोंडीतून मार्ग काढण्यासाठी धडपडत असलेल्या पालकांना व विधत्र्थियना अनेक अडचणी ना सामोरे जावे लागत होते. मात्र, या वाहतूक कोंडीत रस्ता मोकळ करण्यासाठी वाहतूक पोलिस दिसत नसल्याने वाहनधारक व नागरिकांनी प्रचंड संताप व्यक्त केला. एकिकडे पावसाचे वातावरण झालेले असताना दुसरीकडे विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य व गणवेशासाठी खाजगी शाळांकडून विशिष्ट दुकानांमधून गणवेश खरेदीचा आग्रह होत असल्याने पालकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला.

नाशिक शहरातील सुमारे तीन ते चार लाख विद्यार्थी येत्या सोमवारपासून शैक्षणिक सत्रात शाळांमध्ये प्रवेश करणार आहेत. यामध्ये किमान खाजगी इंग्रजी माध्यमाच्या दीडशेहून अधिक शाळांमध्ये सुमारे दोन लाख विद्यार्थी शिक्षण घेत असून या विद्यार्थ्यांच्या शाळांसाठी गणवेश खरेदीला पालकांना तब्बल दोन दोन तीन तीन तास रांगेत ताटकळत उभे राहावे लागत असल्याचे चित्र आज बघायला मिळाले.

पोलिस यंत्रणेने फिरवली पाठ

शहरात एकाचवेळी हजारोच्या संख्येने शालेय साहित्य खरेदीसाठी पालकवर्ग त्यात अधिकतर प्रमाणात महिला वर्गाचा समावेश असताना सोनसाखळी चोरीच्या अथवा इतर लुटीच्या घटना घडण्याची शक्यता लक्षात घेता पोलिसांनी गस्त घालणे आवश्यक होती. वाहतुक कोंडी दूर करण्यासाठी वाहतूक पोलिस अपेक्षित असताना त्यांनी या गर्दीकडे पाठ फिरवली.

बातम्या आणखी आहेत...