आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बालिका दिन साजरा:रचना विद्यालय प्राथमिक विभागात बालिका दिन साजरा

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

रचना विद्यालय प्राथमिक विभागात सावित्रीबाई फुले जयंती (बालिका दिन) उत्साहात साजरा करण्यात आला. प्रमुख अतिथी म्हणून रेखा बागूल तर कार्यक्रमाच्या अध्यक्षा शोभा कोठावदे उपस्थित होत्या.

बालिका सावित्रीबाईंची वेशभूषा करून उपस्थित होत्या. गौरवी महाले हिने ‘मी सावित्रीबाई बोलतेय’ गीत उत्तमरित्या सादर केले. याप्रसंगी प्रमुख अतिथींनी सावित्रीबाईंचा जीवन प्रवास, त्यांचे विचार व कार्य विद्यार्थ्यांना समजावून सांगितले शिक्षकांनी ‘लेक वाचली’ या गीताचे सादरीकरण करून प्रबोधन केले. सूत्रसंचालन स्वाती एडके, चैत्राली काळे यांनी केले. यशवंत चौरे यांनी आभार मानले.

बातम्या आणखी आहेत...