आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवे पोस्ट तिकीट:खाटीक समाज संघटनेचे संस्थापक रघुनाथराव जाधव यांच्या पाेस्ट तिकीटाचे शरद पवारांच्या हस्ते अनावरण

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय खाटीक समाज संघटनेचे अध्यक्ष स्वर्गीय रघुनाथ जाधव यांच्या पोस्ट तिकीटाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.

भारत सरकारच्या पोस्ट विभागाने अखिल भारतीय खाटीक समाज संघटनेचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय रघुनाथराव जाधव यांच्या कार्याची दखल घेत त्यांचे पोस्ट तिकीट प्रकाशित केले. या तिकीटाचे अनावरण त्यांच्या 98 व्या जयंती निमित्त करण्यात आले.

कोण होते रघुनाथराव जाधव?

स्वर्गीय रघुनाथराव जाधव यांनी त्यांच्या उपनगराध्यक्षपदाच्या काळात अलाैकिक काम केले. अखिल भारतीय हिंदु खाटीक समाज संघटनेच्या माध्यमातून त्यांनी फारशा सुविधा उपलब्ध नसतानाही देशव्यापी दाैरे करून समाजाला एकत्रित करण्याचे काम केले. त्यांच्या या कार्यामुळेच देशभरात विखुरलेला समाज एकत्र आला आहे.

सामाजिक कार्याची आवड असलेल्या नानांच्या कार्याची दखल घेत पाेस्ट विभागाने त्यांचे छायाचित्र असलेल्या पाेस्ट तिकीटाचे प्रकाशन केले आहे. देशाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते नाशिकमध्ये त्यांच्या तिकिटाचे रविवारी (दि.९) अनावरण करण्यात आले.

यावेळी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, माजी आमदार हेमंत टकले, माजी खासदार समीर भुजबळ, दिलीप खैरे,रंजन ठाकरे, रवींद्र पगार, काेंडाजीमामा आव्हाड, रघुनाथराव जाधव यांचे पुत्र रमेश जाधव, विनायक जाधव, सनी जाधव, सचिन जाधव, व्यंकटेश जाधव आदी उपस्थित हाेते.

हत्तीवरून काढली होती मिरवणूक

स्वर्गीय रघुनाथराव जाधव यांनी समाजाच्या न्याय हक्कासाठी अनेकवेळा आंदोलने केली होती. त्रंबकेश्वर येथील कुशावर्त येथील लढ्यासाठी त्यांनीच पुढाकार घेतला होता. त्यांच्या या कार्याची ख्याती हळूहळू देशभर पसरली होती. त्यामुळे आंध्र प्रदेश मध्ये त्यांची हत्तीच्या अंबारीतून मिरवणूक काढण्यात आली होती.