आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Nashik
  • Rahul Gandhi Invited To Come To Kumbh Mela Information About Kumbh Mela And Trimbakeshwar Was Obtained From Congress Workers Of Nashik During Bharat Jodo Yatra

कुंभमेळ्याला येण्याचे राहुल गांधींना निमंत्रण:भारत जोडो यात्रेत नाशिकच्या पदाधिकाऱ्यांकडून घेतली कुंभमेळा, त्र्यंबकेश्वरची माहिती

नाशिक11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारत जोडो यात्रेत खासदार राहुल गांधी यांनी नाशिकच्या कुंभमेळ्याबद्दल तसेच त्र्यंबकेश्वरची माहिती घेतली. या यात्रेतून नाशिकमध्ये परतलेले युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष स्वप्निल पाटील यांनी पत्रकारांशी बोलतांना ही माहिती देत याबाबत विस्तृत चर्चा झाल्याचेही सांगितले.

भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात दाखल झाली होती. या काळात अतिशय जोमाने, ऊर्जेने व उत्साहाने ठिकठिकाणी या यात्रेचे सर्व जिल्ह्यांमध्ये स्वागत झाले. यात्रेच्या सुरुवातीपासूनच महाराष्ट्रातील आयोजन कमिटीचे सदस्य असलेल्या नाशिक युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष स्वप्निल पाटील यांनी खासदार राहुल गांधी यांच्याशी नाशिकच्या कुंभमेळ्याबाबत तसेच पंचवटीचे पौराणिक महात्म्य, त्र्यंबकेश्वर देवस्थान याबाबत रस दाखवत स्वतः माहिती जाणून घेत चर्चा केली.

येत्या 'कुंभमेळ्यास 'शाही स्नान व ध्वजारोहण ' सोहळ्यास येण्याचे आमंत्रण नाशिककरांतर्फे स्वप्निल पाटील यांनी राहुल गांधी यांना दिले आहे.

भारत जोडो यात्रेत चालत असताना पहिल्या दिवसापासून खा. राहुल गांधी त्या त्या क्षेत्रातील सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, राजकीय, ऐतिहासिक, पौराणिक माहिती जाणुन घेत आहेत, समजून घेत आहेत.

यात्रा बुलढाणा येथे असताना राहुल गांधी यांनी स्वप्निल पाटील यांच्याकडून संपूर्ण कुंभमेळ्याची माहिती घेतली. शाही स्नान नाशिक जिल्ह्यातील ज्योतिर्लिंग श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर , तसेच उत्तर महाराष्ट्रातील आदिवासी भागांवरील माहिती जाणून घेऊन या येत्या कुंभमेळ्यास येण्याचा नक्की प्रयत्न करेल असे सुतोवाचही केले.

स्वप्निल पाटील हे पूर्ण यात्रा चालत असून यात्रेच्या नियोजनातील कमिटी सदस्य ते आहेत. महाराष्ट्रातील बुलढाणा वाशिम हिंगोली यासह नांदेड जिल्ह्यात भारत जोडो यात्रेत नाशिकहून अनेक पदाधिकारी आणि ग्रामीणमधूनही बहुसंख्य पदाधिकारी मोठया संख्येने सहभागी झाले होते.

या यात्रेत शेगाव येथील जाहीर सभेप्रसंगी नाशिक जिल्ह्यातून शंभरहून कार्यकर्ते रवाना झाले होते. या सभेच्या सुरुवातीला राहुल गांधी यांनी कार्यकर्त्यांशी सवांद साधला. त्याचवेळी नाशिक जिल्ह्यातील संघटन कौशल्य शिस्तबद्धता यावर पक्षाच्या कार्यकर्त्यांशी चर्चा केली.

बातम्या आणखी आहेत...