आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानाशिक जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या वतीने हात से हात जोडो अभियानाची सुरुवात पक्षनिरीक्षक अॅड. संदीप पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत व जिल्हा कॉंग्रेस अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे यांच्या अध्यक्षतेखाली कॉंग्रेस भवन, महात्मा गांधी रोड नाशिक येथे आज संपन्न झाले.
आता हात से हात जोडो - संदीप पाटील
पक्षनिरीक्षक संदीप पाटील म्हणाले, भारत जोडो यात्रा राहुल गांधी यांनी यशस्वी करून दाखवली. अनेक लोकांनी यात सहभागी होऊन प्रतिसाद दिला. हात से हात जोडो अभियानाची सुरुवात होत असून ते 26 मार्चपर्यंत जिल्ह्यात राबविण्यास येणार आहे. या माध्यमातून प्रत्येक घटकांपर्यंत जाण्याची चांगली संधी ह्या माध्यमातून निर्माण झाली.
निरीक्षकांची नेमणूक झाली - शेवाळे
जिल्हा कॉंग्रेस अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे यांनी सांगितले की, हात से हात जोडो अभियानाची सुरुवात झाली असून याबाबत जिल्हा स्तरावरून तालुका निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. ह्या अभियानात मी सहभागी होऊन उपस्थित राहणार असल्याचे नमूद केले.
व्यासपीठावर रमेश कहांडोळ, अजबराव पाटील, संपत वक्ते, ज्ञानेश्वर काळे, सोमनाथ मोहिते आदी उपस्थित होते. बैठकीसाठी संजय जाधव, मधुकर शेलार, अॅड. समीर देशमुख, प्रकाश पिगळ, सखाराम भोये, गणपत चौधरी, डॉ. राजेंद्र ठाकरे, प्रा. प्रकाश खळे, रामदास धांडे, निवृत्ती कातोरे, उमाकांत गवळी, निवृत्ती महाले, किशोर कदम, उदय पवार, नामदेव राऊत, धर्मराज जोपळे, पंडितराव गायकवाड, नितीन बच्छाव, नामदेव राऊत, आदींसह उपस्थित होते.
अभियानाचे तालूकानिहाय निरीक्षक
ज्ञानेश्वर काळे - नाशिक, उत्तम भोसले - सिन्नर, सपंत वक्ते - निफाड, रतन जाधव - इगतपुरी, रामदास धांडे - त्र्यबंकेश्वर, रमेश कहाडोळे - येवला, ज्ञानेश्वर चव्हाण - चांदवड, किशोर कदम - देवळा, भिमराव जेजुरे - नांदगाव, उत्तम ठोबंरे - मनमाड, अॅड. अरुण पठाडे, गोटुनाना पाटील - बागलाण, दिलीप पाटील - मालेगाव, प्रा. अनिल पाटील - कळवण, भिका पाटील चौधरी - दिंडोरी, पंडीत गायकवाड - पेठ, धर्मराज जोपळे - सुरगाणा आदी निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.