आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई:हुक्का पार्लरवर छापा;‎ मालक व ग्राहकांवर गुन्हा‎

इंदिरानगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

‎ शहरातील अवैध धंदे बंद‎ करण्यासाठी पाेलिस आयुक्तांच्या‎ मार्गदर्शनाखाली नियुक्त केलेल्या‎ अंमली पदार्थ विराेधी विशेष‎ पथकाकडून इंदिरानगर भागातील‎ पेरूच्या बागेत राजराेस चालणाऱ्या‎ हुक्का पार्लरवर छापा टाकण्यात‎ आला. या छाप्यात पाेलिसांनी‎ धूम्रपानास मनाई असणाऱ्या‎ ठिकाणी अवैधरित्या हुक्का‎ चालविणाऱ्या हाॅटेल मालकासह‎ नऊ ग्राहकांना ताब्यात घेत गुन्हा‎ दाखल केला आहे.‎ पाेलिस पथकाने हाॅटेलमध्ये‎ हुक्क्याचे वेगवेगळे फ्लेवर, अंमली‎ पदार्थ व इतर साहित्य जप्त केले.‎ पाेलिस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या‎ संकल्पनेतून अमली पदार्थविराेधी‎ विशेष पथकाकडून अवैधरित्या‎ अंमली पदार्थ बाळगणारे व विक्री‎ करणाऱ्यांविराेधात कारवाईची‎ माेहीम हाती घेण्यात आली आहे.

या‎ अंतर्गत पाथर्डी फाटा ते इंदिरानगर‎ भागाला जाेडणाऱ्या भागात हॉटेल द‎ पेरू फार्म येथे पथकाला‎ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसह‎ युवक-युवती माेठ्या संख्येने‎ धुम्रपान करण्याबराेबरच प्रतिबंधीत‎ हुक्का पीत असल्याची माहिती‎ पाेलिसांना मिळाली हाेती. त्यानुसार‎ पाेलिसांनी हाॅटेलवर छापा टाकला.‎ हाॅटेलचे व्यवस्थापक संशयित‎ नितीन शांताराम आहिरे व हाॅटेल‎ मालक संशयित शंकर राजाराम‎ पांगरे (रा. टाइम ब्लॉसम अपार्टमेंट,‎ चौथा मजला, बडदेनगर) यांना‎ ताब्यात घेण्यात आले.

‎त्यांच्याविराेधात उपनगर पाेलिस‎ ठाण्यात बेकायदा हुक्का बार‎ चालवून प्रतिबंधित हुक्का ग्राहकांना‎ सेवनासाठी जागा उपलब्ध देण्यास‎ इतर गुन्हे दाखल करण्यात आले‎ आहे. सात ग्राहकांनाही हे प्रतिबंधित‎ तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन करताना‎ आढळून आल्याने‎ त्यांच्याविराेधातही गुन्हा दाखल‎ करण्यात आला आहे. पोलिस‎ उपआयुक्त (गुन्हे) प्रशांत बच्छाव,‎ सहायक आयुक्त वसंत मोरे यांच्या‎ मार्गदर्शनाखाली सहायक पेालिस‎ निरीक्षक एच. के. नागरे यांच्या‎ पथकाने कारवाई केली.‎

बातम्या आणखी आहेत...