आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Nashik
  • Raid On Nashik Trader, 3000 Kg Jaggery Worth Rs 2.5 Lakh Seized On Suspicion Of Adulteration, Action Taken By Food Administration Department

नाशिकमधील व्यापाऱ्यावर छापा:भेसळीच्या संशयावरून अडीच लाखांचा 3 हजार किलो गूळ जप्त, अन्न प्रशासन विभागाची कारवाई

नाशिक18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

रविवार पेठ येथील बाजारपेठेत होलसेल गुळाची विक्री करणाऱ्या राजेश ट्रेडींग कंपनीत भेसळीच्या संशयावरून अन्न प्रशासन विभागाने छापा टाकून 2 लाख 40 हजार 480 रुपये किमतीचा 3 हजार किलो गूळ जप्त केला. या घटनेमुळे व्यापाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

सेंद्रीय गूळ म्हणून विक्री

बाजारपेठेत सध्या गुळाला जास्त मागणी आहे. त्यामुळे अनेक किरकोळ विक्रेते होलसेल व्यापाऱ्यांकडून गूळ खरेदी करून त्याची सेंद्रींय गूळ म्हणून विक्री करतात. गुळाची विक्री करण्यासाठी शहरात येणाऱ्या महामार्गांवर ठिकठिकाणी चारचाकी वाहनातून गुळाची विक्री होत आहे. गुळामध्ये रंग टाकून भेसळ केली जात असल्याची तक्रार अन्न औषध प्रशासन विभागाला प्राप्त झाली होती. त्यानुसार अन्न सुरक्षा अधिकारी अमित रासकर, अविनाश दाभाडे, योगेश देशमुख यांच्या पथकाने रविवार पेठेतील राजेश ट्रेडींग कंपनीवर छापा टाकून गुळ जप्त केला आहे. जप्त केलेला गुळ सबंधित कंपनीतच सील करण्यात आला असून त्याचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. विश्लेषण अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई होणार असल्याची माहिती अन्न सुरक्षा अधिकारी रासकर यांनी दिली. नाशिक विभागाचे सह आयुक्त चंद्रशेखर साळुंके, सहायक आयुक्त गणेश परळीकर व विवेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

हॉटेल व्यावसायिकास नोटीस

शहरातील अनेक हॉटेलमध्ये व्यवस्थित स्वच्छता केली जात नसल्याने अन्न पदार्थांमध्ये झुरळ निघत असल्याची तक्रार अन्न व औषध प्रशासन विभागाला मिळाली होती. त्यानुसार अन्न सुरक्षा अधिकारी अमित रासकर यांनी कॉलेजरोडवरील कृष्णा व्हेज डिलाइट या हॉटेलची तपासणी केली असता हॉटेलच्या स्वयंपाक घरात अस्वच्छता आढळून आली. त्यामुळे सबंधित व्यावसायिकास सुधारणा नोटीस बजावण्यात आली आहे. शहरातील सर्वच हॉटेलची अचानक तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वतीने देण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...