आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराछत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य स्थापनेसाठी दिलेला लढा, गड-किल्ल्यांची केलेली स्थापना हा इतिहास आजच्या पिढीला माहिती व्हावा यासाठी सिंहगर्जना युवा मंचच्या वतीने पुढाकार घेण्यात आला आहे. मंचच्या वतीने शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त रायगडावर ३५१ ध्वजांची सलामी दिली जाणार आहे.
विशेष म्हणजे, प्रत्येक ध्वजावर शिवाजी महाराजांनी जिंकलेला वा बांधलेल्या किल्ल्यांचे नाव असणार आहे. सोहळ्यानंतर हेच ध्वज राज्यात ३५१ ठिकाणी वितरीत केले जाणार आहे.
राज्याभिषेक सोहळा
छत्रपती शिवाजी महाराजांचा ३५० वा शिवराज्याभिषेक सोहळा ६ जून दुर्गराज रायगडावर पार पडणार आहे. ३५० वा सोहळा असल्याने यंदा हा जल्लोषात व लाखो शिवभक्तांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.
या सोहळ्यासाठी देश-विदेशातून शिवराज्यभिषेकसाठी शिवप्रेमी रायगडावर उपस्थित राहतात. नाशिकचे विश्वविक्रमी पथक म्हणून ओळख असलेली नाशिकची गर्जना सिंहगर्जना दरवर्षी रायगडावर वादन स्वरूपात शिवराज्याभिषेक दिनी सेवा पुरवते.
351 किल्ल्यांची नावे ध्वजावर
यावर्षीदेखील ३५० वा शिवराज्याभिषेक दिन औचित्य साधून ३५१ भगव्या ध्वजांची शिवप्रेमी हस्ते सलामी देणार असून ३५१ किल्ल्याची नावे ध्वजांवर लिहिलेली असणार आहे. रायगडावर जो शिवप्रेमी हा ध्वज सलामी देणार तोच शिवप्रेमी हा ध्वज घेऊन आपल्या घरी परतणार असून या माध्यमातून ३५० वा शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर ३५१ महाराष्ट्रातील विविध ३५१ भागात ध्वज जातील. शिवभक्त महाराष्ट्रामधील विविध शहर, गाव अशा ३५१ ठिकाणी ध्वज पोहोचवण्याचे नियोजन करण्यात अाले आहे.
ध्वजावर लिहिलेल्या किल्ल्याचे नाव त्याचा इतिहास त्याचा प्रचार, प्रसार व अविस्मरणीय सोहळा हा कायमस्वरूपी आठवणीत रहावा, गडकिल्ले संवर्धनाला हातभार लागावा या दृष्टीने सिंहगर्जना युवा मंचने नियोजन केले आहे. या सोहळ्यासाठी श्रीमंत छत्रपती संभाजीराजे, युवराज्ञी संयोगीताराजे छत्रपती व हेमंत साळुंखे यांचे मार्गदर्शन लाभत आहे.
जनजागृतीचा प्रयत्न
३५० वा शिवराज्याभिषेक सोहळ्याचे औचित्य साधत शिवगर्जना युवा मंचच्या वतीने ३५१ ध्वजांची सलामी दिली जाणार आहे. या माध्यमातून गड-किल्ले संवर्धनाबाबत जनजागृती हाेण्यास देखील मदत होणार आहे. - प्रीतम भामरे ,संस्थापक अध्यक्ष, सिंहगर्जना युवा मंच महाराष्ट्र
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.