आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकाच दिवसात रेल्वेकडून 23 लाखांचा दंड वसूल:फुकट्या प्रवाश्यासह अनाधिकृत पदार्थ विक्रेत्यांवरही कारवाई

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

रेल्वे प्रशासनाने भुसावळ विभागात एक दिवस तिकीट तपासणी मोहीम राबवली. या मोहीमेत फुकट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून एका दिवसात तब्बल 23 लाख 27 हजार रुपयांचा दंड वसुल केला.

मध्य रेल्वेच्या भुसावल विभागात विभागीय रेल्वे व्यवस्थापक एस एस केडीया यांच्या अध्यक्षतेखाली आणि मुख्य वाणिज्य व्यवस्थापक शिवराज मानसपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली वाणिज्य विभाग व रेल्वे पोलिस फोर्स यांच्या संयुक्त विद्यमाने खंडवा ते इगतपुरी, अमरावती ते भुसावळ, चाळीसगाव ते धुळे; जलंब ते खामगाव या दरम्यान एक दिवसीय तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात आली.

यामध्ये वाणिज्य निरीक्षक, तिकीट तपासनीस आणि रेल्वे पोलिस फोर्सचे संयुक्त पथक तयार करण्यात आले होते. यामध्ये एकूण 86 प्रवासी गाड्यांची तपासणी करण्यात आली. नाशिक, मनमाड, भुसावळ, खांडवा, अकोला, बडनेरा या रेल्वे स्थानकांवरही तपासणी करण्यात आली.

या मोहीमेसाठी 3 अधिकारी, 180 तिकीट तपासणीस, 45 वाणिज्य विभागाचे कर्मचारी आणि 55 पोलिस कर्मचारी यांनी सहभागी झाले होते. यामध्ये स्पेशल स्काँड यांनी 3 हजार 419 प्रवाशांची तपासणी करुन त्यांच्याकडुन 19 लाख 97 हजार 565, रेल्वे स्थानकावरील तपासणीसांनी 203 प्रवाशांची तपासणी करुन त्यांच्याकडून 1 लाख 5 हजार 270 रुपये तर प्रवासी गाड्यामध्ये फिरणाऱ्या तपासणीसांनी 293 विनातिकीट प्रवाशांकडून 2 लाख 24 हजार 251 रुपयांचा आर्थिक दंड वसुल केला.

त्यामुळे फुकट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर नक्कीच आळा बसणार असल्याचे वाणिज्य व्यवस्थापक शिवराज मानसपूरे यांनी सांगितले. यावेळी प्रवासी गाड्यांमध्ये अनाधिकृत पदार्थ विक्रेत्यांवरही कारवाई करण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...