आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Nashik
  • Rain Havoc In Vanjarwadi; 8 Million Worth Of Damage To Houses Including 100 Hectares Of Land; Villagers Fear Due To This Much Rain For The First Time| Marathi News

दिव्य मराठी ग्राउंड रिपार्ट:वंजारवाडीत पावसाचा कहर; १०० हेक्टर जमिनीसह घरांचे ८० लाखांवर नुकसान; प्रथमच एवढा पाऊस झाल्याने ग्रामस्थांत भीती

नाशिकरोडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आठवडाभर विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा नाशिक जिल्ह्यात धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. बुधवारी रात्री जिल्ह्यातील विविध ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. मात्र नाशिक शहर आणि लगतच्या परिसरात अतिजोरदार पाऊस झाला तर वंजारवाडीत रात्री दहा वाजता पावसाने कहर केला. शेत जमिनींमधील पिकांसह माती वाहून गेल्याने अंदाजे १०० हेक्टर शेतीचे नुकसान झाले. तर अनेक घरे पाण्यात गेल्याने एकूण ८० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येते.

अंगणवाडीत ४ फूट पाणी
गावात असलेल्या अंगणवाडीत तीन ते चार फूट पाणी साचल्याने मुलांच्या खेळण्या, खाण्याच्या वस्तू सर्व पाण्याने खराब झाल्या. तर वर्गात चिखलच चिखल झाला आहे. पाहणी करण्यासाठी आमदार सरोज अहिरे, माजी आमदार योगेश घोलप, सरपंच ज्ञानेश्वर शिंदे, प्रवीण पाळदे हे उपस्थित होते.

नुकसानग्रस्तांना आर्थिक मदतीची मागणी
वंजारवाडीतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांचे त्वरित पंचनाम्यासाठी तहसीलदारांबराेबर बोलणे झाले आहे. नुकसान झालेल्या ग्रामस्थांना देखील आर्थिक मदतीची मागणी केली आहे.
योगेश घोलप, माजी आमदार

विठाबाई ढगे यांच्या २ म्हशी वाहून गेल्या,मीराबाई सामोरे यांच्या घरातून ४ पोते गहू, २ पोते तांदूळ, ३ पोते सोयाबीन डोळ्यासमोर वाहून गेले.अनिता जाधव यांच्या शेतातील टोमँटो पाण्यात गेले, जमिनीचे नुकसान दशरथ शिंदे यांच्या साडेतीन हजार काकडीच्या वेलीसह नुकतेच काम केलेली जमीन वाहून गेली आहे.

बातम्या आणखी आहेत...