आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हवामान:विदर्भासह मराठवाड्यात पाऊस, उ. महाराष्ट्रात ढगाळ वातावरण; मालेगावला 12.4 अंश सेल्सियसची नोंद, तर वाऱ्यांचा वेग कायम

नाशिकएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

उत्तर कर्नाटक ते ओडिशादरम्यान १ किमी उंचीवर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले तसेच अरबी समुद्र व बंगालच्या उपसागरातून वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे विदर्भात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. काही ठिकाणी गारपीटही झाली. मराठवाड्यातील औरंगाबाद शहरात हलका पाऊस होऊन १ मिमीची नोंद झाली. उर्वरित राज्यात मात्र ढगाळ वातावरण व वारे वाहत असल्याने गारवा कायम होता. किमान तपमानात १ ते ३ अंशांनी वाढ झाली होती.

राज्यात वातावरणात बदल झाला असून मराठवाड्यात ढगाळ वातावरणासह हलका पाऊस, विदर्भात मध्यम पावसासह गारपीट, तर उत्तर महाराष्ट्रात ढगाळ वातावरणासह गार वारे वाहत आहेत.

विदर्भातील नागपूर, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये ठिकठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. तसेच चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यंातील काही ठिकाणी गारपीटदेखील झाली. औरंगाबाद शहरात दिवसभर ढगाळ वातावरणासह हलका पाऊस झाला.

२० जानेवारीपर्यंत हवामानाचा अंदाज
- १५ जानेवारी : विदर्भात हलका ते मध्यम पावसासह उर्वरित राज्यात ढगाळ वातावरण
- १६ जानेवारी : ढगाळ वातावरण
- १७ जानेवारी : अंशत: ढगाळ वातावरण
- १८ जानेवारी : स्वच्छ आणि निरभ्र आकाश, थंडी वाढणार
- १९ जानेवारी : स्वच्छ आणि निरभ्र आकाश, थंडीत होणार वाढ
- २० जानेवारी : स्वच्छ आणि निरभ्र आकाश, थंडीत होणार वाढ