आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामान्सून राज्यात दाखल झाला असला तरी त्याच्या प्रवासाला वातावरण अनुकूल आहे, मात्र जोर कमी असल्याने संथगतीने प्रवास होत आहे.
उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यासह विदर्भात पूर्वमोसमी पावसाला अनुकूल वातावरण आहे. रविवारी काही ठिकाणीच पाऊस झाला. मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटात पाऊस झाला. पैठण तालुक्यातील जावळे आडगाव येथे एका चाळीस वर्षीय महिलेचा वीज पडून मृत्यू झाला, तर फुलंब्री तालुक्यात दोन तरुण ठार झाले.
दरम्यान, पुढील २ दिवस आणि सध्याचा मुसळधार पाऊस ईशान्य भारतात कायम राहण्याची शक्यता आहे. तेलंगण, पूर्व राजस्थान, कोकण आणि गोवा, उपहिमालयी पश्चिम बंगालमध्ये मुसळधार पाऊस झाला.
राजस्थान, मध्य प्रदेशसह 4 राज्यांत मान्सूनपूर्व पाऊस, दिल्ली, हरियाणास 15 जूनपर्यंत दिलासा नाही
मराठवाड्यात वीज कोसळून महिलेसह तीन ठार
पैठण तालुक्यातील जावळे आडगाव येथे माहेरी आलेल्या सरूबाई शाहदेव लांडे (रा. रोहिलागड, ता. अंबड, जि.जालना) यांच्यावर शनिवारी दुपारी एक वाजता वीज कोसळली. त्या घरासमोरील घरगुती साहित्य भिजू नये म्हणून उचलून ठेवण्यासाठी त्या बाहेर पडल्या होत्या. त्यांचा घाटीत मृत्यू झाला. फुलंब्री तालुक्यातील सताळा बु. येथे रविवारी दुपारी १२ च्या सुमारास वीज पडून शेळ्या चारण्यासाठी शेतात गेलेले रोहनसिंग विजयसिंग शिंदे (१६) व रवी जनार्दन कळसकर (२२) यांचा मृत्यू झाला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.