आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विसर्ग:पाऊस थांबला, गंगापूरमधून 4833 क्यूसेकचा विसर्ग

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गुरुवारी पहाटे जोरदार फलंदाजी करणाऱ्या पावसाने सायंकाळीही आपला जोर कायम ठेवल्याने आठवडाभरानंतर गंगापूर धरणातून ५८८४ क्यूसेकने सुरू केलेला विसर्ग शुक्रवारी पाऊस थांबल्याने कमी करण्यात आला. सायंकाळी ८ वाजता गंगापूरमधून १०५१ क्यूसेकने कपात करत ४८३३ क्यूसेकने विसर्ग सुरू ठेवण्यात आला होता. जुलैपासून पाऊस जिल्ह्यावर मेहेरबान झाला असून धरणेही तुडुंब भरली आहेत. त्यामुळे पाणलोट क्षेेत्रात जराही पाऊस पडला तरीही विसर्ग करावा लागत आहे.

सद्यस्थितीत नाशिक शहराला पाणी पुरविणारे गंगापूर धरण ९८ टक्के भरले आहे. त्यातच गुरुवारच्या जोरदार पावसाने ४८३३ क्यूसेकने पाणी सोडले जात होते. त्यामुळे दुसऱ्या दिवशीही गोदाघाटावर पूरस्थिती कायम होती. दरम्यान दारणा, मुकणे आणि वालदेवीतूनही विसर्ग सुरू असल्याने नांदूरमध्यमेश्वर बंधाऱ्यातूनही गोदापात्रात ३५ हजार ७५२ क्यूसेकने पाणी सोडले जात होते. तसेच पावसासह धरणांमध्ये येणाऱ्या पाण्याच्या येव्यावरही पाटबंधारे विभाग लक्ष ठेवून असून रात्री पाऊस वाढला तरीही शक्य झाल्यास दिवसाच पाणी सोडण्यासाठी प्रयत्न असल्याचे पाटबंधारे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...