आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवकाळी पाऊस:उत्तर-मध्य महाराष्ट्रासह विदर्भ-मराठवाड्यात आज पावसाचा इशारा, तुरळक ठिकाणी गारपिटीचीही शक्यता

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यात एक महिन्याहून अधिक काळापासून असलेल्या वारा खंडितता प्रणालीमुळे ठिकठिकाणी अवकाळी पाऊस होत आहे. विदर्भात बुधवारी ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वारे वाहणार असून काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. यवतमाळ व नागपूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी गारपिटीचीही शक्यता आहे. धुळे, नंदुरबार, पुणे, नाशिक, सातारा, सांगली, कोल्हापूर, परभणी, बीड या जिल्ह्यातही हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

दरम्यान, मंगळवारी मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात काही ठिकाणी अगदी हलक्या पावसाची नोंद झाली. दरम्यान, अवकाळी पावसाचा येणाऱ्या पावसाच्या हंगामावर कोणताही परिणाम होणार नसल्याचे हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितले.

मराठवाड्यात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज
4 आणि 5 मे रोजी मराठवाडा विभागात जोरदार वाऱ्यासह पाऊस किंवा मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा अंदाज आहे. ढगाळ आकाशामुळे ६ आणि ७ मे रोजी मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस किंवा मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.