आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:रेन वॉटर हार्वेस्टिंग ही काळाची गरज; गोदामाई प्रतिष्ठानच्या कार्यक्रमात अभिनेते चिन्मय उदगीरकरांचे आवाहन

नाशिक2 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

यंदाच्या पावसाळ्यात बजवा कर्तव्य
येणाऱ्या काळात पाणी प्रश्न आ वासून उभा असेल आणि त्यातूनच माणूस-माणूस, गल्ली-गल्ली, प्रांत-प्रांत किंबहुना देशा-देशात वाद होऊन यातूनच तिसरे महायुद्ध उभे राहू शकते. त्यामुळे जगभरातील प्रत्येक कुटुंबाने ही बाब गांभीर्याने घेत रेन वॉटर हार्वेस्टिंग माझ्या दारी, मी माझे कर्तव्य बजावले, आता आपली जबाबदारी या म्हणीप्रमाणे यंदाच्या पावसाळ्यात रेन वॉटर हार्वेस्टिंग करत पावसाळ्यात पडणाऱ्या प्रत्येक थेंबाचा जास्तीत जास्त निचरा आपल्या सभोवतालच्या जमिनीत करत आपण आपली पाण्याची स्वतः बँक निर्माण करावी माय वॉटर बँक रिचार्ज अन्यथा याचे परिणाम भविष्यात भयावह होऊ शकतात अशी भीती चिन्मय उदगीरकर यांनी याप्रसंगी व्यक्त केली.

सध्या जगभरात प्रत्येक जाणकारांच्या मते जर विश्वयुद्ध झाले तर हे फक्त पाण्यावरूनच होऊ शकते अशी चर्चा सुरू असून ती उगाचच नाही, असे प्रतिपादन मराठी सिनेअभिनेते तथा निर्माते चिन्मय उदगीरकर यांनी केले. गोदामाई प्रतिष्ठानच्या वतीने ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग करत माझ्या दारी मी माझे कर्तव्य बजावले, आता आपली जबाबदारी’ या उपक्रमाच्या माहितीफलकाचे अनावरण चिन्मय उदगीरकर यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बाेलत हाेते.

रेन वॉटर हार्वेस्टिंगही काळाची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. याप्रसंगी ‘योग योगेश्वर जय शंकर’ या मराठी मालिकेचे निर्माते संजय झनकर, शंकर महाराजांची भूमिका साकारणारा बालकलाकार अरूष, नमामि गोदाचे राजेश पंडित, लेखक संकेत शिंदे, नीलेश सूर्यवंशी यांच्यासह गोदामाई प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आदिनाथ ढाकणे उपस्थित होते. अभिनेते उदगीरकर यांनी सांगितले की, जमिनीतील भूजल साठा हा अत्यंत कमी झाला असून पृथ्वीच्या पोटातील जवळपास ७० टक्के पाणीसाठा हा संपलेला आहे.

यामुळे येणाऱ्या काळात अनेक भागांचे वाळवंट होऊ शकते अशी भीती सध्याच्या परिस्थितीवरून दिसून येत आहे. त्यामुळे आता पाणीप्रश्न हा जागतिक दर्जाचा प्रश्न तयार झाला असून याच मुद्यावर तिसऱ्या महायुद्धाची ठिणगी पडू शकते की काय अशी भीती उगाचच वाटत नसून जे भाग कधी काळी पाण्याने सुजलाम‌् सुफलाम‌् होती. पाण्याबाबत नामुष्की सध्या पृथ्वीवर निर्माण झाली आहे. सततच्या दुष्काळाने मोठ्या प्रमाणात स्थलांतर होऊन तो भाग भकास होत आहे तर तेथील अनेक कंपन्यांना कुलूप लावावे लागत असल्याचे उदगीकर म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...