आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकीय:राज भेटीतून राजकारणाच्या चंद्र‘कला’; पाटील ऐकणार राज यांच्या परप्रांतीयांविषयी भाषणाचा व्हिडीओ

नाशिकएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि मनसेप्रमुख राज ठाकरे गेल्या तीन दिवसांपासून नाशिक दौऱ्यावर आहेत. शासकीय विश्रामगृहावर मुक्काम असल्याने या नेत्यांची रविवारी (दि.१८) सकाळी भेट झाली. या भेटीत विविध विषयांवर चर्चा झाली असली तरी राज यांच्या पक्षाची परप्रांतीयांविषयीची भूमिका समजून घेण्यासाठी ते त्यांच्या बिहारमध्ये व्हायरल झालेल्या भाषणाचा व्हिडीओ आपल्याला पाठवणार असून तो एेकणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.

भाजप कार्यालयात पाटील यांनी पत्रकार परिषदेत सुरुवातीलाच ठाकरेंच्या भेटीचा तपशील दिला. सध्या तरी भाजप-मनसेच्या युतीची काही चर्चा नाही. भाजप राष्ट्रीय पक्ष असल्याने मनसेची परप्रांतीयांविषयीची भूमिका चालणार नाही. स्थानिकांना ८० टक्के राेजगार ही भूमिका सर्वांचीच आहे. तशीच भूमिका राज यांची असली पाहिजे, असे पाटील म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...