आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज ठाकरेंशी युतीबाबत चर्चा नाही:बावनकुळे म्हणाले- विरोधकांचा संयम सुटला, सरन्यायाधीशांवर टीका करण्यापर्यंत त्यांची मजल गेली

नाशिक21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पक्षकार असताना त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या सर्व न्यायाधीशांचा सत्कार केल्याबाबत काँग्रेसकडून टीका केली जात आहे. यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी टीका केली. ''विरोधी पक्षाचा संयम सुटला आहे. देशाची न्यायव्यवस्था व सरन्यायाधीशांवर टीका करण्यापर्यंत विरोधकांची मजल गेली. ही बाब भारतीय लोकशाहीच्या दृष्टिकोनातुन घातक आहे.'' अशी टीका त्यांनी केली.

राज ठाकरे यांचे सर्वांशीच मैत्रीपूर्ण संबंध आहे, ते मैत्रीतील राजा माणूस आहे. माझ्या मुलाच्या लग्नासाठी खास त्यांनी 2 तास वेळ दिला. त्यामुळे त्यांच्या घरी जाऊन मी आभार मानले. देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी, आशीष शेलार असे सर्वांशी त्यांचे संबंध आहे. मात्र, आमच्या कोणाच्याही भेटीत युतीबाबत चर्चा झाली नाही. सध्या तरी मनसेची युती करण्याबाबत कोणताही प्रस्ताव नाही. आगामी निवडणुका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटासोबत लढणार असल्याचे स्पष्टीकरण भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नाशिकमध्ये दिले.

पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये राज्याचा विकास खुंटला. मुख्यमंत्री तर अडीच वर्ष लोकांमध्ये मिसळतच नव्हते. आता सर्वसामान्य लोकांच्या विचारधारेचे सरकार राज्यामध्ये आले आहे.

पंकजा मुंडे यांच्या आमदारकीचा निर्णय केंद्राच्या हाती

राज्यपाल नियुक्त 12 आमदारामध्ये पंकजा मुंडे यांना स्थान मिळणार का तसेच त्या भाजप नेतृत्वावर नाराज आहेत का यासंदर्भात विचारले असता, बावनकुळे म्हणाले की, त्या कोणावरही नाराज नाही. माझी त्यांची बऱ्याच वेळा चर्चा होत असते. त्यांच्याकडे मध्य प्रदेश सहप्रभारी तसेच भाजपाच्या केंद्रीय सचिव पदाची जबाबदारी आहे. बारा आमदार नियुक्ती संदर्भात सर्वाधिकार केंद्र शासनाच्या संसदीय समितीला आहे. राज्यस्तरीय समिती केवळ नावे केंद्रीय समितीकडे पाठवते असे सांगत पंकजा मुंडे यांच्या संभाव्य आमदारकी बाबत बावनकुळे यांनी केंद्राकडे बोट दाखवले. तसेच 12 आमदारांची यादी राज्यपालांकडे पाठवल्याची बातमी मीडिया मधूनच आली अशी खिल्ली उडवली.

पटोले बावचळले

नितीन गडकरी यांनी काँग्रेसमध्ये यावे अशा नाना पटोले। यांच्या वक्तव्याचा समाचार घेत ते बावचाळले अशी टीका बावनकुळे यांनी केली. राज्यातील सत्ता गेल्यामुळे पटोले हे सैरभैर झाले असून त्यांनी काँग्रेसची स्थिती कशी सुधारेल याकडे लक्ष दिले पाहिजे. अशोक चव्हाण तसेच पृथ्वीराज चव्हाण हे भाजपामध्ये येणार का यासंदर्भात त्यांचे पक्षांमध्ये स्वागत असेल असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले. काँग्रेसमध्ये सुधारणा करण्याच्या दृष्टिकोनातून ते कधीकधी पक्ष विरोधी वक्तव्य करतात मात्र, त्याकडे चांगले हेतूने बघता त्यांचे खच्चीकरण करण्याचे काम काँग्रेस श्रेष्टी करत असल्याचाही चिमटा बावनकुळे यांनी घेतला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पक्षकार असताना त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या सर्व न्यायाधीशांचा सत्कार करण्याबाबत काँग्रेस कडून सुरू असलेल्या टीके संदर्भात बावनकुळे म्हणाले की, आता विरोधी पक्षाचा संयम सुटला आहे. देशाची न्यायव्यवस्था व सरन्यायाधीशांवर टीका करण्यापर्यंत यांची मजल गेली आहे. ही बाब भारतीय लोकशाहीच्या दृष्टिकोनातुन घातक असल्याची टीकाही केली.

बातम्या आणखी आहेत...