आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआज वातावरण अधिकाधिक दूषित होत चाललेले आहे. यात ध्वनी प्रदूषण, वायू प्रदूषण, जल प्रदूषण अशा अनेक प्रदूषणामुळे वातावरण कलुषित झालेले वाटते. मात्र, या सर्व प्रदूषणाच्या मुळामध्ये माईंड पॉल्युशन (मन प्रदूषण) आहे. मनाचे प्रदूषण दूर करण्यासाठी राजयोग मेडिटेशन अतिशय उपयुक्त सिद्ध होतो. ज्याप्रमाणे गढूळ पाण्यावर तुरटी फिरवावी त्याप्रमाणे राजयोग मेडिटेशनद्वारे आपल्या मनातील गडूळ विचार अशुद्धी व विकार युक्त विचारांना आपण दूर करू शकतो, असे प्रतिपादन ब्रह्माकुमारी वीणा दीदी यांनी केले
विश्व पर्यावरण दिवसाचे औचित्य साधून येथील ब्रह्माकुमारी सेवा केंद्रातर्फे ब्रह्माकुमारी वीणा दीदी यांच्या अध्यक्षतेखाली वृक्ष रोप वाटप कार्यक्रम राबविण्यात आला. स्वर्णिम भारताकडे या संकल्पनेंतर्गत देश स्वातंत्र्याच्या 75 वर्ष स्मृतिप्रीत्यर्थ 75 वृक्ष रोपांचे वितरण करण्यात आले. ब्रह्माकुमारी संस्थेच्या मुख्यालय स्तरावर सुद्धा 25 ऑगस्ट रोजी ब्रह्माकुमारी संस्थेच्या वरिष्ठ दादी प्रकाशमणीजी यांचे पुण्यस्मरणचे औचित्य साधून कल्पतरू वृक्षारोपण अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे.
5 जून ते 25 ऑगस्ट या दरम्यान 40 लाख वृक्षारोपण करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवण्यात आले आहे. एक व्यक्ती एक वृक्ष या संकल्पनेने संपूर्ण भारतात हे अभियान सर्व स्थानीय सेवा केंद्रमधून राबवण्याचे सूचना मुख्यालयातून देण्यात आलेली आहे. यावेळी डॉ. राहुल गवळी, प्राध्यापक संजय खांडे सर, प्रा. महेश खेडकर, प्रा. गुळवे, नॅचरोपॅथी डॉक्टर स्वप्निल सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.