आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Nashik
  • Rajarshi Shahu Maharaj Scholarship Scheme| Selection Of Two Students From Nashik | Higher Studies Abroad | Highest Number Of Students From Nagpur

राजर्षी शाहु महाराज शिष्यवृत्ती योजना:परदेशात उच्च शिक्षणासाठी नाशिक विभागातील दोन विद्यार्थ्यांची निवड, नागपूरचे सर्वाधिक विद्यार्थी

नाशिक3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सामाजिक न्याय विभागामार्फत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटक प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात पदव्युत्तर पदवी आणि संशोधनात्मक अभ्यासक्रमाच्या (पीएचडी) अध्ययन करण्यासाठी राजर्षी छत्रपती शाहु महाराज शिष्यवृत्ती योजनेचा लाभ दिला जातो. पदव्युत्तर पदवी आणि पीएचडीसाठी जागतिक स्तरावर तीनशेच्या आतील रँकमध्ये परदेशात शैक्षणिक शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते.

या योजनेअंतर्गत 2022-23 या शैक्षणिक वर्षाकरीता राज्यातून एकूण 75 विद्यार्थ्यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे. त्यात नाशिक विभागातील 2 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. यात नाशिकचे प्रसनजित अनिल बैसणे व भुसावळ येथील श्रावणी नारायण निंबोळकर यांचा समावेश आहे.

नागपूर विभागातून 38 विद्यार्थी

महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील 75 विद्यार्थ्यांना दरवर्षी राजर्षी छत्रपती शाहु महाराज शिष्यवृत्ती योजनेचा लाभ दिला जातो. या योजनेअंतर्गत 2022-23 या शैक्षणिक सत्रात शासन निर्णय सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभाग 26 ऑगस्टनुसार राज्यातून एकूण 75 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली असुन यात नागपूर विभागातील सर्वाधिक 38 विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. मुंबई विभागातील 16, पुणे विभागातील 12, लातुर विभागाच्या 3, औरंगाबाद विभागाच्या 2 व अमरावती विभागातून 2 अशा एकुण 75 विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. 38 जणांची प्रतिक्षा यादीत निवड झाली आहे.

मुख्यमंत्र्यांच्या शुभेच्छा

राजर्षी छत्रपती शाहु महाराज शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत परदेश शिष्यवृत्तीसाठी निवड झालेल्या सर्वच विद्यार्थ्यांचे राज्याचे सामाजिक न्याय विभागाचे मंत्री तथा मुख्यमंत्री एकनाथ शिदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,विभागाचे सचिव सुमंत भांगे, आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे,प्रादेशिक उपायुक्त नाशिक डॉ. भगवान वीर यांनी अभिंनदन केले असुन पुढील शिक्षणासाठी शुभेछा दिल्या आहेत. समाज कल्याण आयुक्तालयाच्या वत्तीने लवकर या सर्व विद्यार्थांना स्कॉलरशीप लेटर दिले जाणार आहे.

बातम्या आणखी आहेत...