आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:अफू विकणारा राजस्थानचा तस्कर अटकेत, 224 ग्रॅम अफू जप्त

नाशिक6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमली पदार्थ अफू विक्री करण्यास आलेल्या राजस्थानच्या तस्कराला अटक करण्यात आली आहे. मुंबई-आग्रा रोडवरील वाडीवऱ्हे पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गोंदे दुमाला येथे अपर अधीक्षकांच्या पथकाने ही कारवाई केली. दर्शन अश्विनीकुमार सोलंकी (रा. श्रीरामवाडी घोटी, मूळ रा.जोधपूर) असे या संशयिताचे नाव आहे. अपर अधीक्षक माधुरी कांगणे यांना माहिती मिळाली एक जण घोटी ते नाशिक रोडने अमली पदार्थ वाहतूक करत आहे. या माहितीच्या आधारे पथकाने महामार्गावर सापळा रचला. गोंदे दुमाला येथे संशयित दुचाकी (एमएच १५ एचएक्स २५९९) येताना दिसली. त्यास रोखून गाडीला अडवलेल्या पिशवीची झडती घेतली असता यात अफू असल्याचे निदर्शनास आले. संशयिताच्या विरोधात वाडीवऱ्हे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...