आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Nashik
  • Rajesh Tope । Health Minister Instructs Health Department Commissioner And Director, Appointment Orders Only After Resolution Of Disputed Health Recruitment Examination Complaints.

दिव्य मराठी इम्पॅक्ट:आराेग्यमंत्र्यांचे आराेग्य विभाग आयुक्त व संचालकांना निर्देश, वादग्रस्त आराेग्य भरती परीक्षेच्या तक्रारींचे निराकरण झाल्यावरच नियुक्त्यांचे आदेश

नीलेश अमृतकर | नाशिक18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आरोग्य विभागाच्या वादग्रस्त गट ‘क’ व गट ‘ड’ वर्गाच्या परीक्षांबाबत प्रत्येक तक्रारीचे निराकरण झाल्यावरच नियुक्तीची प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. याबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आरोग्य विभाग आयुक्त व संचालकांना आदेश दिले आहेत. ‘दिव्य मराठी’तील वृत्तानंतर आरोग्य विभाग खडबडून जागा झाला आहे.

आरोग्य विभागाने न्यास कम्युनिकेशन या खासगी संस्थेमार्फत गट ‘क’च्या २,७३९ पदांसाठी २४ ऑक्टोबरला तर ३१ ऑक्टोबरला गट ‘ड’च्या ३ हजार ४६२ रिक्त जागांसाठी परीक्षा घेतली होती. मात्र, दोन्ही परीक्षांवेळी सोशल मीडियाद्वारे पेपर फुटल्याची तसेच काही ठिकाणी नियाेजित वेळेपेक्षा तब्बल २-२ तास विलंबाने प्रश्नपत्रिका मिळाल्याने गोंधळ झाला होता. ठिकठिकाणी आंदोलने व नागपूर आणि

मुंबई हायकोर्टांत याचिकादेखील दाखल झाल्या.
तक्रारींकडे दुर्लक्ष करत आरोग्य विभागाने नियोजनानुसारच न्यास संस्थेवर ‘अर्थ’पूर्ण विश्वास ठेवत थेट १५ दिवसांतच निकाल प्रसिद्ध करण्याची तयारी केली आठही उपसंचालकांना संस्थेकडून निवड झालेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध होताच समुपदेशनाद्वारे नियुक्तीचे आदेशच संचालकांनी काढले हाेते.

नियुक्तीची प्रक्रिया ७ डिसेंबरच्या आतच पूर्ण करण्याचेही आदेशात म्हटले आहे. या आदेशाने आराेग्य यंत्रणाच बुचकळ्यात पडली असून भरतीच्या संपूर्ण प्रक्रियेवरच संशय व्यक्त हाेत आहे. ‘दिव्य मराठी’ने याबाबत वृत्त प्रसिद्ध करताच याचिकाकर्त्यांनीही आराेग्य विभागाचा निषेध नाेंदवत न्यायालयात धाव घेणार असल्याचे सांगितले.

मंत्री-अधिकाऱ्यांत असमन्वयाचे दर्शन : आराेग्यमंत्र्यांनी दाेघा अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचे सांगितल्यानंतर ‘दिव्य मराठी’च्या प्रतिनिधीने तसा प्रयत्न केला. त्यांना मेसेज करून विषयही सांगितला. डाॅ. अर्चना पाटील यांच्याशी वारंवार संपर्क केल्यानंतर त्यांनी केवळ एकच संदेश पाठविला. गट ‘क’ परीक्षेच्या उत्तर तालिका प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.

परीक्षार्थींनी केलेल्या सूचनांची छाननी करण्यात येत असून संबंधित परीक्षा घेणाऱ्या संस्थेशी चर्चा करून येत्या दाेन दिवसांत निकाल जाहीर करण्याचे त्यांनी सांगितले. परंतु, तक्रारींच्या निराकरणाचे आदेश आराेग्यमंत्र्यांनी दिले असताना अधिकाऱ्यांकडून त्यावर काहीही उत्तर न देता त्यांना निकालाची घाई झाली असून त्यांच्यातील असमन्वय दिसून येत आहे.

नियुक्त्यांबाबत पारदर्शक प्रक्रिया राबविणार

आराेग्यसेवा आयुक्त डाॅ. एन. रामास्वामी व संचालक डाॅ. अर्चना पाटील यांच्या देखरेखीखाली पारदर्शक प्रक्रिया राबविण्यात येत आहे. ज्या ठिकाणी परीक्षेच्या वेळी गाेंधळ झाला तसेच जेथे काही तक्रारी असतील त्यांचे निराकरण झाल्याशिवाय नियुक्ती देऊ नये, असे स्पष्ट आदेश दिले आहेत. तरीही तक्रारी असल्यास या दाेघा अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. - राजेश टाेपे, आराेग्यमंत्री

बातम्या आणखी आहेत...