आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साखरेला चांगले दिवस:ऊसाला प्रतिटन 3700 रूपयांचा भाव द्या; पाठीवर स्वारी करणाऱ्यालाच वाघ खाऊन टाकतो- खासदार राजू शेट्टींचा सल्ला

नाशिक2 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऊसाला प्रतिटन 3700 रुपये भावल द्या. अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तथा माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे. ते सध्या नाशिक दौऱ्यावर असून, पत्रकार परिषदेत ते बोलत होते. नाशिकमध्ये उत्पादन खर्चापेक्षा ऊस कमी किमतीत मिळतो.

सांगली, कोल्हापूर, सातारा यापेक्षा नगरची स्थिती वेगळी नाही. मात्र, टनामागे पंधराशे रुपयांचा फरक पडतो. असे शेट्टी म्हणाले. तसेच भ्रष्टाचाराचा आरोप झालेले कारखाने चौकशी करून सुरू करण्यात यावे. अशी मागणीही त्यांनी केली आहे.

साखरेचा क्विंटलमागे 400 ते 500 रूपयांचा भाव वाढला आहे. तसेच इथेनॉलचे देखील भाव वाढले आहेत. साखरेला चांगले दिवस आले, मात्र नाशिकच्या शेतकऱ्यांना त्याचा फायदा घेता येत नाही. द्राक्ष पिकांचेही अवकाळीने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

आता छाटणी कधी करायची असा प्रश्न बागायतदारांसमोर आहे. छाटणी केली तरी पाऊस पडतो, नाही केली तरी पडतो. बाहेरचे व्यापारी गायब होण्याच्या घटनाही घडतात. अशा व्यापाऱ्यांवर कारवाईसाठी काही तरतूद नाही. त्यामुळे परवानाधारक व्यापाऱ्यांनाच खरेदी करायला परवानगी देण्याची मागणीही शेट्टी यांनी केली आहे.

द्राक्ष परिषद घेणार

नाशिक जिल्ह्यात द्राक्ष परिषद घेणार असल्याची घोषणा राजू शेट्टी यांनी केली आहे. द्राक्ष उत्पादकांची चिंता मिटण्यासाठी प्रयत्न करणार असून, शेतकऱ्यांना आधार देण्याची वेळ आली आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची ताकद नाशिकच्या शेतकऱ्यांच्या मागे लावू, असा इशाराही शेट्टी यांनी यावेळी दिला आहे.

भाजपमध्ये आल्यावर चौकशी नाही
साखर कारखान्यांमध्ये गैरव्यवहार होत असेल तर कारवाई झाली पाहिजे. काही कारखान्यांची चौकशी होते. पण जे भाजप पक्षात आले त्यांची चौकशी होत नाही. जे भाजपमध्ये येत नाहीत त्यांची मात्र कसून चौकशी केली जाते. असे म्हणत राजू शेट्टी यांनी भाजपवर टीकास्त्र केले.

‘..अन्यथा ज्याला पाठीवर स्वार केलं त्याला वाघ खाऊन टाकतो’

पुढे शेट्टींनी राज्यात सुरू असलेल्या एसटी संपावर भाष्य केले, ते म्हणाले की, एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत सहळ्यांची सहानुभूती आहे. वास्तव आणि व्यवहार याचा विचार करायला हवा. विद्यार्थ्यांचा विचार करून, इशारा देऊन संपाबाबत पुनर्विचार करावा लागेल. इतका चांगला संप यशस्वी झाला पाहिजे ही माझी इच्छा आहे. काही उथळ लोक यात घुसले आहेत.

शेतकरी चळवळ आणि एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन वेगळे आहे. वाघावर स्वार होऊन पायउतार होणे अवघड आहे. अन्यथा ज्याला पाठीवर स्वार केले त्याला वाघ खाऊन टाकतो. असा सल्ला देखील शेट्टींनी दिला आहे.

बातम्या आणखी आहेत...