आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अभिनेत्यापेक्षा शेतकऱ्यांचे पाहा:गांजा घेतल्याचे म्हटले जाणाऱ्या अभिनेत्याच्या आत्महत्येची चर्चा, पण दुधाला भाव मिळत नसल्याने आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यावर दुर्लक्ष -राजू शेट्टी

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आमच्यासाठी गुन्हे नवीन नाहीत, कितीही गुन्हे दाखल करा आम्ही आंदोलने करतच राहू

एकीकडे गांजा घेत असल्याचे म्हटल्या जाणाऱ्या अभिनेत्याच्या आत्महत्येची सर्वत्र चर्चा सुरू असते. तर दुसरीकडे, दुधाला भाव मिळत नसल्याने आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याची कुठेच चर्चा होत नाही. हे अतिशय दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया खासदार राजू शेट्टी यांनी टीव्ही-9 शी बोलताना दिली आहे. ते शिर्डी येथील रेवनाथ काळे यांच्या आत्महत्येवर बोलत होते.

स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी आपल्या कार्यकर्त्यांसह दुधाला योग्य भाव मिळवून देण्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन करत आहेत. याच दरम्यान, त्यांच्यावर आणि त्यांच्या 40 कार्यकर्त्यांवर बारमतीमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कितीही गुन्हे दाखल करा आम्ही आंदोलने करतच राहू

राजू शेट्टी पुढे बोलताना म्हणाले, "आमच्यासाठी गुन्हे नवीन नाहीत. आणखी एका गुन्ह्याची भर पडली एवढेच. दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मोर्चा काढला आहे. मोर्चात गायीचा छळ केल्याचा आरोप अतिशय हास्यास्पद आहे. कितीही गुन्हे दाखल करा आंदोलन करत राहू."

मंदिर उघडण्यापेक्षा शेतकऱ्याला न्याय देणे महत्वाचे

देशात आणि राज्यात मंदिर आणि धार्मिक स्थळे उघडण्याची मागणी जोर धरत आहे. परंतु मंदिर उघडण्यापेक्षा संकटात सापडलेल्या शेतकऱ्याकडे पाहावे. देवाची पूजा करणारा शेतकरी आज संकटात सापडला आहे. देऊळ, मंदिर, मस्जिद उघडणे महत्वाचे नाही, असेही राजू शेट्टी म्हणाले आहेत.