आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:रमजानमुळे बाजारात रौनक; खरेदीसाठी गर्दी

नाशिक4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • दूधबाजार, चौक मंडई, बागवानपुरा, मुलतानपुरा, कथडा, नानावलीत गजबज

रमजानच्या उपवासासाठी इफ्तारी खरेदीसाठी येथील दूधबाजार परिसरात मोठ्या प्रमाणावर गर्दी उसळली होती. दरम्यान, हा परिसर सायंकाळच्या वेळेस वाहतुकीसाठी बंद करण्यात येत आहे. रमजान पर्व सुरू होताच नमाजसाठी सर्व मशिदींमध्ये ही गर्दी होत आहे. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या निर्बंधांमुळे रमजानचा उत्साह मंदावला होता. परंतु यावर्षी शासनाने सर्व निर्बंध शिथिल केल्याने सर्वसामान्य मुस्लिमबांधव व व्यवसायिकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. रमजाननिमित्त दूधबाजार, चौक मंडई, बागवानपुरा, मुलतानपुरा, आयेशा मशीद परिसर, मोहम्मद अली रोड, कथडा, नानावली आदी भागांमध्ये मिनी मार्केट सुरू झाले आहेत. दूधबाजार व चौक मंडईतील ऐतिहासिक जहांगीर मशिदीच्या मोकळ्या जागेवर तात्पुरते शेड उभारण्यात आले आहेत.

या शेडमध्ये विविध प्रकारची दुकाने थाटण्यात आली आहेत. काल थाटण्यात आली आहेत. उपवासाच्या इफ्तारीवेळी शहरातील अनेक मशिदींमध्ये जेवणाची व्यवस्था करण्यात आली येत आहे. याशिवाय सर्व मशिदीत रोजा सोडण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. गर्दीला नियंत्रित करण्यासाठी बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत.

बातम्या आणखी आहेत...