आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक:उपमुख्यमंत्रिपदाची ऑफर नाकारून भाजपसोबतच राहिलो : आठवले; आता विधान परिषदेची 1 जागा द्या

नाशिकएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 21 मे रोजी विधान परिषदेच्या 9 जागांसाठी निवडणूक

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीच्या काळात शिवसेना पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी दिलेली उपमुख्यमंत्रिपदाची ऑफर नाकारून भाजपसोबत राहिल्याची आठवण करून देत रिपाइं अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक राज्यमंत्री रामदास आठवले यांनी विधान परिषदेत १ जागा मिळावी, अशी मागणी भाजपकडे केली आहे. हिंदुत्ववादी पक्ष ही भाजपची जनमानसातील प्रतिमा बदलवण्यात तसेच देशभरातील दलित मतांचा टक्का भाजपकडे वळवण्यात रिपाईची महत्त्वाची भूमिका राहिल्याने भाजपने महाराष्ट्राच्या विधान परिषदेत किमान १ जागा द्यावी, अशी कार्यकर्त्यांची भावना असल्याचे मत आठवले यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना मांडले. 

येत्या २१ मे रोजी महाराष्ट्राच्या विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक होत आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रभावामुळे आपण भाजपसोबत राहिल्याचे ते म्हणाले. तेव्हापासून गेली सात-आठ वर्ष आपण भाजपची साथ सोडली नसून दलित समाजात भाजपचा जनाधार वाढविण्यात, दलित वस्त्यांमध्ये भाजपला प्रवेश मिळवून देण्यात आणि हिंदुत्ववादी पक्ष ही भाजपची प्रतिमा बदलवण्यास रिपाइंचा महत्त्वाचा वाटा असल्याने, विधान परिषदेत किमान १ जागा मिळावी अशी मागणी ते करत असल्याचे सांगण्यात आले.

केंद्रीय नेत्यांशी चर्चा करू : रामदासजी मला बोलले असून याबाबत नेत्यांशी बोलू, असे विरोधी पक्षनेते फडणवीस म्हणाले.

आघाडीच्या काळात सहा सदस्य

भाजपच्या वाट्याला चार जागा येण्याची शक्यता आहे. त्यासाठी भाजपमध्ये अनेक दिग्गजांची रस्सीखेच सुरू आहे. त्यात आता रिपाईनेही उडी घेत एका जागेची मागणी केली आहे. आतापर्यंत रिपाईला विधान परिषदेत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारच्या काळातच प्रतिनिधीत्व मिळाले होते. टी एम कांबळे, अनिल गोंडाणे, प्रीतमकुमार शेगावकर, सुमंतराव गायकवाड आणि दयानंद म्हस्के हे रिपाईचे सहा सदस्य विधान परिषदेवर निवडून गेले होते.

बातम्या आणखी आहेत...