आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापोटच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधाम बापाला जन्मठेपेची शिक्षा ठोठवण्यात आली. गुरुवारी ( दि. २३) जिल्हा व सत्र न्यायालयाने हा निकाल दिला. राजु सिताराम आहिरे (४०, रा. फुलेनगर) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.
अभियोग कक्षाने दिलेल्या माहितीनुसार, ९ एप्रिल २०२१ रोजी फुलेनगर मायको दवाखान्याजवळ आरोपी राजु आहिरे हा पत्नी व पीडित अल्पवयीन मुलीसोबत वास्तव्यास असतांना पत्नी कामावर गेल्यानंतर घरात एकटी मुलगी झोपलेली असतांना आरोपीने मुलीचा गळा दाबन जीवे मारण्याचा प्रयत्न करत तिच्यावर बलात्कार केला. पत्नी घरी आल्यानंतर मुलीने अत्याचाराची माहिती दिली. आरोपीच्या विरोधात बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्कालीन निरीक्षक धनश्री पाटील यांनी तपास केला. जिल्हा व सत्र न्यायाधिश एम.व्ही.भाटीया यांनी शिक्षा ठोठावली. सरकार पक्षातर्फे अॅड. रेवती कोतवाल यांनी कामकाज पाहिले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.