आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआपत्ती या अनिश्चित असतात. पूर्वतयारी, पूर्व चेतावणी आणि जलद निर्णायक प्रतिसादांसह आपण त्या आपत्तीचा प्रभाव अंशतः किंवा पूर्णपणे रोखू शकतो, असे मार्गदर्शन प्रा. डाॅ. मीनाक्षी गवळी यानी केले. मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या नाशिक येथील मराठा हायस्कूलमध्ये नागरी संरक्षण सप्ताहांतर्गत व्याख्यानात त्या बाेलत हाेत्या. यावेळी प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाप्रसंगी नागरी संरक्षण विभागाचे सहायक नियंत्रक देवेंद्र बावस्कर, उपनियंत्रक आनंद गडकरी, प्रा. योगेंद्र शिवाजीराव पाटील, प्रा. डाॅ. मीनाक्षी गवळी, कल्पना माळोदे, मंगला काकड आदी अधिकारी या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित होते. त्याचबरोबर मराठा हायस्कूलच्या मुख्याध्यापिका कल्पना वारुंगसे, उपमुख्याध्यापक मोरे सर, पर्यवेक्षक प्रकाश पवार, शिवाजी शिंदे, रंजना घंगाळे हे व्यासपीठावर उपस्थित होते.
नागरी संरक्षण सप्ताहात आपत्ती व्यवस्थापन प्रात्यक्षिकात मराठा हायस्कूलच्या एनसीसी विभागाच्या ५० विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविला. देवेंद्र बावस्कर यांनी विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात मार्गदर्शन केले. प्रत्यक्ष आपत्ती घडल्यानंतर आपण काय केले पाहिजे या सर्व गोष्टींचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांकडून प्रात्यक्षिकाच्या स्वरूपात त्यांनी करून घेतले. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका कल्पना वारुंगसे या मार्गदर्शन करताना म्हटले की, केंद्र शासनाने २००५ साली े आपत्ती व्यवस्थापन कायदा केला.
याचा मूळ उद्देश नैसर्गिक किंवा इतर कोणत्याही आपत्तीमध्ये नुकसान टाळणे हा आहे. हा कार्यक्रम प्रशासकीय यंत्रणेकडून राबविला जात असला तरी संकटकालीन परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी लोकसहभागही तितकाच महत्त्वाचा आहे असे त्या म्हणाल्या.सूत्रसंचालन क्रीडा शिक्षिका मंगला शिंदे यांनी केले. आभारप्रदर्शन सांस्कृतिक समिती प्रमुख चैताली गीते यांनी मानले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.