आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकलेक्टर्स साेसायटी ऑफ न्युमिसमॅटीक अॅण्ड रेअर आयटेम्स, नाशिक या संस्थेकडून सुरू असलेले रेअर फेअर प्रदर्शनाने नाशिककरांना माेहीनी घातली आहे. या प्रदर्शनात शिवकालीन तलवारी, ढाल, खंजीर, चिलखत, कट्यार यांसारखी शस्त्रात्रे आणि चंद्रगुप्त माैर्य ते छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्या काळातील साेने, चांदी, तांब्याची नाणी, वेगवेगळे मुघल राजे, टिपु सुलतान यांच्या राजवटीतील चलन, दुर्मिळ वस्तु यांचे पन्नास स्टाॅल्स आकर्षण ठरत आहेत. दाेन दिवसात दहा हजारावर नाशिककरांनी येथे भेट दिली आहे.
मनाेहर गार्डन इंदिरानगर बाेगद्याजवळ हे दुर्मिळ नाेटा, नाणी, वस्तुंचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. मुघल काळात नाशिकचे नाव गुलशनाबाद हाेते, त्याकाळातील मुघल राजाचे ‘गुलशनाबाद’ लिखीत चांदीचे नाणे आवर्जुन पहायला मिळते आहे. हेच नाणे दाेन लाख रूपयांना मागील प्रदर्शनात विकले गेले हाेते. भारताच्या दाेन हजार वर्षापासूनच्या वैभवशाली, ऐतिहासिक व संस्कृतीचे साक्षीदार असलेले दुर्मिळ व माैल्यवान नाणी, चलनाचा प्रवास, त्यासंबंधिची माहीती येथे नाशिककर घेत आहेत.
1960 च्या काळात 1, 5 आणि 10 रूपयांच्या भारतीय चलनी नाेटा अरब देशांमध्ये चलनात हाेत्या. अरबातील सहा देशांत या नाेटा चालत, त्या लाल रंगाच्या नाेटा येथे भेट देणाऱ्यांसाठी आकर्षण ठरत आहेत.
या प्रदर्शनात संस्थेतर्फे विद्यार्थ्यांना इतिहास व छंदाची आवड निर्माण व्हावी म्हणून काही नाणी व पाेष्टाची तिकिटे माेफत वाटण्यात येणार आहे. आत्तापर्यत दहा हजारावर नागरिकांनी भेट दिली असून रविवारी प्रदर्शनाचा शेवटचा दिवस आहे.
- अॅड. राजेश जुन्नरे, उपाध्यक्ष, कलेक्टर्स साेसायटी ऑफ न्युमिसमॅटीक अॅण्ड रेअर आयटेम्स
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.