आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुर्मिळ अजगर:नाशिक जिल्ह्यात पेठमध्ये आढळला दुर्मिळ इंडियन पायथन जातीचा अजगर

बोरगाव25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पेठ तालुक्यातील कुंभाळे शिवारात एका भाताच्या शेतात इंडियन पायथन जातीचा आठ फूट लांबीचा दुर्मिळ अजगर शेतकऱ्याला आढळला. वन परिक्षेत्र अधिकारी रूपेश गावित यांनी त्यास सुरक्षितपणे ताब्यात घेत त्याचा अधिवास असलेल्या जंगलात सोडले. केशव सीताराम गायकवाड भाताच्या शेतात शनिवारी (दि. ३) काम करत असताना त्यांना हा अजगर आढळला. साधारण चार वर्षाच्या असलेल्या या अजगराला बघण्यासाठी परिसरातील लोकांनी मोठी गर्दी केली होती.

रूपेश गावित (खडकीपाडा, ता. पेठ) हे भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यात वन परिक्षेत्र अधिकारी (आरएफआे) असून सध्या ते गावी होते. त्यांनी गावकऱ्यांना अजगराची माहिती देत त्याला पेठमधील घनदाट जंगलात सोडून दिले.

अजगर बिनविषारी, ४ वर्षांचा ^नाशिक जिल्ह्यातही पेठ, सुरगाणा व त्र्यंबकेश्वर तालुक्यात अजगर आढळतात. मात्र, त्याचा अधिवास हा घनदाट जंगल व दलदलीच्या प्रदेशातच असल्याने ते कमी प्रमाणात दिसतात. अजगर पूर्णपणे बिनविषारी असून लहान भक्ष्यांना सहज गिळू शकतो. त्याच्या शरीररचनेमुळे ताे जे भक्ष्य खाताे ते पचवण्याची ताकद त्याच्यात असते. - रूपेश गावित, आरएफओ

बातम्या आणखी आहेत...