आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवयवांची तस्करी:संशयित तस्कराच्या घरातून दुर्मिळ गिधाडाचे अवयव जप्त

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पर्यावरण संवर्धनासाठी वन्यजीवांच्या संरक्षण कायदा अतिशय कठाेर करण्यात आला असूनही राज्यात वन्यजीवांची तस्करी होत आहे. गत आठवड्यात इगतपुरी वनपरिक्षेत्राच्या अधिकाऱ्यांनी बिबट्याची कातडी आणि अवयवांची तस्करी उघडकीस आणली.

याबाबत वन विभागाचे अधिकारी सखोल तपास करीत असतानाच या संशयिताच्या घरात दुर्मिळ होत असलेल्या गिधाडाचे अवयव मिळाले. गिधाडाच्या या अवयवांची तस्करी केली जाते का याची चाैकशी वनपरिक्षेत्र अधिकारी केतन बिरारीस हे करीत आहे.

बातम्या आणखी आहेत...