आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:रंगतदार सामन्यांनी रासबिहारी क्रिकेट करंडकमध्ये चुरस

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गोल्फ क्लब ग्राउंड मैदानावर सुरू असलेल्या रासबिहारी क्रिकेट करंडक स्पर्धेच्या चौथ्या दिवशी सामने रंगतदार झाले. अशोका युनिव्हर्सल वडाळा, रासबिहारी इंटरनॅशनल स्कूल, फ्रावशी अकॅडमी, रवींद्रनाथ विद्यालय (मराठी माध्यम) या विशेष स्कूलने प्रावीण्यपूर्ण कामगिरी करत यश संपादन केले. सकाळ सत्रात अशोका युनिव्हर्सल वडाळा आणि जनता विद्यालय साइखेडा या संघामध्ये झाला. यात अशोका संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. एनडीसीए काेच मंगेश शिरसाट यांच्या हस्ते नाणेफेक करून सामन्यांची सुरुवात झाली.

अशोकाच्या संघाने प्रथम फलंदाजी करत २५ षटकांत ५ गडी बाद २४२ धावांचा मोठा डोंगर जनता विद्यालय समोर ठेवला. जनता विद्यालय संघाला ही धावसंख्या पूर्ण करता आली नाही आणि फक्त ४१ धावा करून हा संघ बाद झाला. त्यांनी १२.४ षटकात ४१ धावा केल्या. अशोका संघाचा २०१ धावांनी एकतर्फी दणदणीत विजय झाला. संघाच्या मास्टर अर्णव रोहन तांबट यास सामनावीर घोषित करण्यात आले. नवले, सुशांत वाघमारे हे पंच होते.

दुुसरा सामना रासबिहारी इंटरनॅशनल स्कूल आणि पोदार इंटरनॅशनल स्कूल यांच्यामध्ये झाला. यात दोन्ही संघामध्ये टाइ झाला. यात पोदार स्कूलने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. रासबिहारी संघाने उत्तम फलंदाजी करत २१.४ षटकांत सर्व गडी गमावून १२९ धावा केल्या आणि १३० धावांचे लक्ष्य प्रतिस्पर्धी संघासमोर ठेवले. पोदार संघाने ५ गडी गमावून २५ षटकांत १२९ धावा केल्या आणि दोन्ही संघामध्ये टाइ जाहीर करण्यात आला. रासबिहारी स्कूल संघाचा अर्जुन शिंदे याने उत्तम गोलंदाजी करत ४ गडी बाद केले.

यास सामनावीर घोषित करण्यात आले. दुपार सत्रात फ्रावशी अकॅडमी आणि रवींद्रनाथ विद्यालय (इंग्लिश माध्यम) यांच्यात झालेल्या सामन्यात रवींद्रनाथ संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

यात त्यांनी २३.२ षटकांत १० गडी गमावून ११८ धावा केल्या आणि ११९ धावांचे लक्ष्य प्रतिस्पर्धी संघासमोर ठेवले. फ्रावशी संघ हे लक्ष्य अगदी सहज पूर्ण करू शकला. फ्रावशी संघाने ७ गडी राखून दणदणीत विजय मिळविला. संघाच्या सिद्धांत मुथा याने उत्तम फलंदाजी ३१ धावा केल्या. त्यास सामनावीर घोषित करण्यात आले. निर्मला कान्व्हेंट स्कूल आणि रवींद्रनाथ विद्यालय यांच्यात सामना रंगला. यात रवींद्रनाथ (मराठी माध्यम ) संघाने प्रथम फलंदाजी केली. या संघाने ६८ धावांनी दणदणीत विजय मिळवला.

बातम्या आणखी आहेत...