आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विवाह सोहळा:नाशिकमध्ये शुभमंगल सावधान..अन् निकाह कबूल है...हिंदू-मुस्लिम दाेन्ही पद्धतीने विवाह

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

खास करण्यात आलेली फुलांची सजावट.... कुुटुंबातील प्रत्येक सदस्याच्या चेहऱ्यावर आेसंडून वाहणारा आनंद अन् मंत्राेच्चार... वधू-वराच्या डाेक्यावर पडलेल्या अक्षता .... अन् त्याच ठिकाणी नंतर ‘निकाह मुबारक हाे’ असे म्हणत एकमेकांना दिलेल्या शुभेच्छा अशा उत्साही वातावरणात गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात चर्चेत असलेला रसिका आडगावकर व आसिफ खान यांचा विवाह साेहळा गुरुवारी (दि. २२) शहरातील एका हाॅटेलमध्ये पार पडला.

शहरातील प्रतिष्ठित सराफ व्यावसायिकाच्या मुलीच्या आंतरधर्मीय विवाह साेहळ्यास अनेक सामाजिक व धार्मिक संघटनांनी विराेध केला हाेता. या विवाहाबाबत साेशल मीडियावर हा लव्ह जिहाद आहे असे वर्णन करत त्यास विराेध केला हाेता व हा विवाह रद्द करण्याची मागणी केली हाेती. मात्र, मुलगी दिव्यांग असून या लग्नाबाबत परिस्थिती वेगळी असल्याचे सांगत मंत्री बच्चू कडू यांनी या लग्नास समर्थन दिले हाेते. गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेला हा विवाह साेहळा १८ मे राेजी पार पडणार हाेता. मात्र त्या तारखेला हा विवाह साेहळा रद्द करण्यात आला हाेता.

याच कारणामुळे हा विवाह हाेणार ही नाही अशा अनेक शंका उपस्थित केल्या जात हाेत्या. मात्र गुरुवारी शहरातील एका हाॅटेलमध्ये सकाळी हिंदू पद्धतीने मंत्राेच्चारात तर सायंकाळी मुस्लिम चालीरीतीप्रमाणे निकाह कबूल करत हा अनाेखा विवाह साेहळा यशस्वीपणे पार पडला. मुलीचे व मुलाचे कुटुंबीय या विवाह साेहळ्यास माेठ्या उत्साहात सहभागी झाले हाेते.

आम्ही एक झाल्याचा एक वेगळाच आनंद
आम्ही दाेेघानी एकमेकांवर प्रेम केले आहे. विवाहास काही अडचणी निर्माण झाल्या. मात्र, विवाह करत आम्ही एकत्र झाल्याचा एक वेगळाच आनंद आहे. -आसिफ खान व रसिका आडगावकर

सर्वांनीच आमची खरी परिस्थिती समजून घ्यावी
विविध संघटनांनी आम्हाला पाठिंबा दिला हाेता. धर्म, जात, पंथ मध्ये न आणता खरी परिस्थिती समजावून घेतली पाहिजे. दाेन्ही पद्धतीने आम्ही हा विवाह साेहळा पार पाडला. आपल्या मुलीचा विवाह माेठ्या थाटामाटात झाला याचा आंनद आहे. - प्रसाद आडगावकर, मुलीचे वडील

बातम्या आणखी आहेत...