आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रथोत्सव:त्रिपुरारी पाैर्णिमेनिमित्त त्र्यंबकला उद्या रथोत्सव

त्र्यंबकेश्वरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

येथे कार्तिक पौर्णिमेनिमित्त सोमवारी (दि. ७) रथोत्सव साजरा होत आहे. यासाठी त्र्यंबकेश्वर देवस्थानतर्फे व्यवस्था करण्यात आली आहे. सोमवारी दुपारी तीन वाजता सजविलेल्या रथात श्री त्र्यंबकेश्वराचा पंचमुखी सुवर्ण मुखवटा ठेवल्यावर रथोत्सव सुरू होईल. या रथास तीन बैलगाड्या जोडण्यात येतील. रथ परंपरेने मेनरोडमार्गे कुशावर्तावर स्नान पूजेसाठी सवाद्य मिरवणुकीने नेण्यात येईल.

सायंकाळी पुन्हा मिरवणूक मंदिरात परतेल. मंदिरात महिलांना त्रिपूर वाती लावण्यासाठी व्यवस्था करण्यात येत आहे. ग्रामस्थांना उत्तर दरवाजातून प्रवेश देण्यात येईल. तर बाहेर जाण्यासाठी दक्षिण व पश्चिम दरवाजा वापरता येईल. दुपारी तीन वाजेनंतर देणगी दर्शन बंद ठेवण्यात येऊन पूर्व दरवाजा मंडप बारीतून दर्शन सुरू राहील. रात्री उशिरा दीपमाळ प्रज्वलित केली जाईल. रस्त्यावर आरती अथवा फटाक्यांची आतषबाजी केली जाणार नसल्याचे देवस्थानतर्फे जाहीर करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...