आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:रत्नागिरी, देवगड हापूसच्या नावाखाली होतेय कर्नाटक हापूसची विक्री; समुद्री वातावरण, मातीमुळे देवगडच्या हापूसचा रंग, चव ठरते आकर्षक; एक पेटी पाच ते साडेपाच हजार रुपयांना

नाशिकरोड4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बाजारात गेल्यानंतर सर्वत्र आंब्याचा सुगंध दरवळत असतो. यामध्ये सध्या हापूस, लालबाग आंबा विक्रीला आला आहे. ग्राहकदेखील आंबा खरेदीला पसंती देताना दिसतात. बहुतांश नागरिक हापूस आंबा खरेदी करतात. मात्र, बाजारात सध्या देवगड व रत्नागिरीच्या नावाखाली कर्नाटकचा हापूस विक्री केला जात आहे. यामुळे ग्राहकांची आर्थिक फसवणूक होत आहे. सध्या देवगड व रत्नागिरी हापूस आंब्याची एक पेटी पाच ते साडेपाच हजार रुपयांना विक्री होत आहे.

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या आंबा आवक वाढली असून सध्या दररोज ४० ते ५० क्विंटल सरासरी आंबा शहरात दाखल होत आहे. उन्हाची तीव्रता वाढली असल्याने आंबा खाण्यासाठी नागरिकदेखील पसंती देत आहे. रत्नागिरी, देवगड आणि पावस या परिसरात समुद्री हवामान आणि मातीमुळे येथील आंब्याची चव ही गोड असते.

त्याचा रंगदेखील केसरी असतो. गरदेखील अधिक असतो. त्यामुळे जाणकार खवय्ये फक्त या भागातील आंबा खाण्यासाठी पसंती देतात. परंतु, बाजारात रत्नागिरी, देवगड या हापूसच्या नावाखाली कर्नाटक हापूसची विक्री केली जात आहे. यामध्ये ग्राहकांची आर्थिक आणि मनासारखा आंबा न मिळाल्याने फसवणूक होत आहे.

बातम्या आणखी आहेत...