आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रास्ता राेकाे आंदाेलन:राऊतांना अटक; सेनेतर्फे रास्ता राेकाे

नाशिक14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी शिवसेना नेत खासदार संजय राऊत यांना अटक केल्यानंतर सोमवारी (दि. १) सकाळी ११ वाजता शिवसेना मध्यवर्ती कार्यालयासमोर शिवसेना माजी नगरसेवक पदाधिकाऱ्यांनी रास्ता राेकाे आंदाेलन करण्यात आले. केंद्रीय तपास संस्थेच्या माध्यमातून शिवसेनेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न हाेत असल्याचा आरोप जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांनी केला आहे.

राऊत यांना ईडीकडून अटक झाल्यानंतर शिवसेना मध्यवर्ती कार्यालय येथे मोठ्या संख्येने शिवसेना पदाधिकाऱ्यांनी जमवून जोरदार निदर्शने केली. खासदार राऊत यांनी उसने पैसे घेतल्याचे कारण पुढे करून त्यांना अडकवले जात असून त्यामागे भाजपाचा हात असल्याचा आरोप महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी केला आहे. यावेळी संपर्क नेते सुनील बागुल, वसंत गीते, दत्ता गायकवाड, विलास शिंदे, शोभा मगर यांच्यासह मोठ्या संख्येने माजी नगरसेवक व अधिकारी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...