आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शैक्षणिक:पारंपरिक विद्यापीठांतील मेडिकलच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांना मान्यता : कुलगुरू डॉ. म्हैसेकर

नाशिकएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • ही आहेत विद्यापीठे, महाविद्यालये

वैद्यकीय पदव्युत्तर महाविद्यालयांच्या जुन्या अभ्यासक्रमांसाठी केंद्र सरकारच्या आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयाकडून नुकतेच शुद्धिपत्रक प्राप्त झाले आहे. त्यानुसार  पारंपरिक विद्यापीठात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची नोंदणी आरोग्य विद्यापीठाशी संलग्नित केली असल्याचे शुद्धीपत्रकाद्वारे सूचित केले आहे,अशी माहिती आरोग्य विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. दिलीप म्हैसेकर यांनी दिली.

कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण म्हणाले की, भारतीय आयुर्विज्ञान परिषद व केंद्र सरकारकडे कुलगुरूंनी स्वतंत्र प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावाची आयुर्विज्ञान परिषदेने केंद्राकडे शिफारस केली होती. 

ही आहेत विद्यापीठे, महाविद्यालये

पारंपरिक विद्यापीठात राज्यातील कोल्हापूरचे शिवाजी विद्यापीठ, औरंगाबादच्या  डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठांचा समावेश आहे.तसेच  सोलापूरच्या डॉ. व्ही. एम. वैद्यकीय महाविद्यालयातील पाच वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रम, मिरजमधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे आठ, अंबाजोगाई येथील एस.आर.टी.आर.  महा.चे दोन, औरंगाबाद  शासकीय वैद्यकीय महा.आणि मुंबई शासकीय वैद्यकीय महा.तील प्रत्येकी एका  पदव्युत्तर अभ्यासक्रमांचा यात समावेश आहे.

बातम्या आणखी आहेत...