आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निर्णय:राज्यातील 15 विद्यापीठांमधील रखडलेल्या पदभरतीस मान्यता

नाशिक10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सुधारित आकृतिबंध, नवीन भरतीवरील निर्बंध आणि त्यानंतर कोविडमुळे रखडलेल्या प्राध्यापकांच्या रिक्त जागांवरील पदभरतीस अखेर राज्य शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून नुकतीच मान्यता मिळाली आहे. पहिल्या टप्प्यात विद्यापीठांमध्ये मंजूर एकूण पदांपैकी ८० टक्के इतक्या मर्यादेत म्हणजेच ६५९ पदे भरण्यास मान्यता मिळाली आहे.

त्यामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात प्राध्यापकांच्या ११० पदे भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे.राज्यातील १२ अकृषी व ३ अभिमत अशा एकूण १५ विद्यापीठांमध्ये प्राध्यापकांच्या अनेक जागा रिक्त आहेत. या विद्यापीठांमध्ये २ हजार ५३४ पदे मंजूर आहेत. त्यात सर्वाधिक ४०० मंजूर पदे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची आहे. त्यानंतर मुंबई विद्यापीठात मंजूर पदांची संख्या जास्त आहेत. ७ आॅगस्ट २०१९ रोजी एकूण रिक्त जागांच्या आधारावर ही पदे भरण्यास मान्यता दिली आहे.

सुधारित आकृतिबंधाच्या निश्चितीअभावी रखडली हाेती प्राध्यापक पदभरती सुधारित आकृतिबंधाच्या निश्चितीअभावी तसेच २०१७ पासून नवीन पदभरतीवरील निर्बंधांमुळे राज्यातील अकृषी व अभिमत विद्यापीठांत प्राध्यापकांच्या अनेक जागा रिक्त होत्या. त्यानंतर २०१९ मध्ये शासनाच्या उपसमितीच्या बैठकीत राज्यातील १५ विद्यापीठांतील मंजूर पदांच्या ८० टक्के इतक्या मर्यादेत पदभरतीस मान्यता दिली हाेती.

त्यानंतर कोविडमुळे वित्त विभागाकडून पदभरतीस पुन्हा निर्बंध लादले गेले. त्यामुळे शिक्षक, शिक्षक समकक्ष, प्राध्यापकांच्या रिक्त पदांवर भरती होऊ शकली नाही. अखेर १८ आॅक्टोबर २०२२ च्या उपसमितीच्या बैठकीत पुन्हा हा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. १६ नोव्हेंबरला राज्य शासनाकडून विद्यापीठांतील मंजूर ६५९ पदांच्या भरतीस मान्यता देण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...