आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फाळके स्मारकाची प्रचंड दुर्दशा:29 एकर जागेत असलेल्या फाळके स्मारकाचे 25 कोटी खर्चून रामोजी फिल्म सिटीच्या धर्तीवर पुनर्निर्माण

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील अत्यंत माेक्याच्या मानल्या जाणाऱ्या पाथर्डी फाट्यावरील 20 एकर जागेत खितपत पडलेल्या फाळके स्मारकाचे हैद्राबादच्या रामाेजी फिल्मसीटीच्या धर्तीवर पुर्ननिर्माण केले जाणार आहे. पालिकेची अर्थिक परिस्थीती नाजुक असल्यामुळे आता जिल्हा नियाेजन समितीतील पर्यटन निधीतंर्गत 25 काेटी रूपयांचा निधी मागण्याची तयारी महापालिकेने सुरू केली आहे. सर्वसाधारणपणे २५ काेटी खर्चाची मर्यादा निश्चित करून रामाेजी फिल्मसीटीमधील काेण काेणत्या प्रमुख बाबी फाळके स्मारकात साकारता येतील याची चाचपणी केली जाणार असून त्यासाठी सल्लागाराची नियुक्ती केली जाणार आहे.

1999-2000 मध्ये त्रिरश्मी लेण्यांच्या पायथ्याशी असलेल्या 29 एकर जागेत उभारलेल्या फाळके स्मारकाची प्रचंड दुर्दशा झाली. सुरूवातीच्याकाळात या प्रकल्पाला नाशिककरांनीच नव्हे तर राज्यभरातून येणाऱ्या भाविक व पर्यटकांनी डाेक्यावर घेतले हाेते. नाशिकमध्ये येणाऱ्यांची पाउले आपोआपच फाळके स्मारकाकडे वळत हाेती. येथील संगीत कारंजा, उद्यानही आकर्षणाचे केंद्र हाेते. दरम्यान, पुढे हा प्रकल्प पालिकेसाठी पांढरा हत्ती पाेसण्यागत ठरला. उत्पन्न कमी व देखभाल खर्चच वाढत गेल्यामुळे फाळके स्मारकाची अवस्था दयनीय हाेत गेली. हा प्रकल्प सुरू करण्यासाठी एकाही सत्ताधारी पक्षाला राजकीय महत्वकांक्षी दाखवता आली नाही.

काही महिन्यापुर्वी तात्कालीन आयुक्त कैलास जाधव यांनी हा प्रकल्प पीपीपीतत्वावर चालवण्यासाठी देण्याकरीता निविदा प्रक्रिया राबवली. त्यात एनडीज आर्ट वर्ल्ड यांचे देकार पात्र ठरल्याने त्यांना काम देण्याचा निर्णय झाला. मात्र, यात लेखापरीक्षकांनी संबधित व्यवहार हा ठेकेदारासाठी पाेषक तर पालिकेसाठी नुकसानकारक ठरल्याचा अहवाल दिला. ही बाब लक्षात घेत पालकमंत्री छगन भुजबळ यांनी फाळके स्मारकाचे खासगीकरण राेखले हाेते. आता हा प्रकल्प पालिकेमार्फत व्यवस्थापन करण्याचा निर्णय आयुक्त तथा प्रशासक रमेश पवार यांनी घेतला असून त्यांनी त्यासाठी आवश्यक निधीची तरतुद डिपीसी अर्थातच जिल्हा नियाेजन समितीकडून करण्याची तयारी सुरू केली आहे.

दहा वर्षात 10.60 कोटींचा तोटा

महापालिकेला या प्रकल्पातून दरवर्षी सरासरी 53 लाखांचा तोटा होत आहे. गेल्या 20 वर्षाेत आतापर्यंत महापालिकेला या प्रकल्पातून 10 काेटी 60 लाख रूपयांचा ताेटा झाला. या स्मारकाच्या पुनर्विकासासाठी सुमारे 18 ते 20 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याचे एनडीज् आर्ट वर्ल्ड तर्फे महापालिकेला देण्यात आलेल्या प्रस्तावात म्हटले हाेते. इतका खर्च करून संबधित ठेकेदार 30 वर्षांच्या कालावधीत महापालिकेला रॉयल्टीपोटी केवळ 8.37 कोटी रुपये देणार हाेता. पालिकेची माेक्याची जागा इतक्या प्रर्दीघकाळासाठी न देता डिपीसीतील निधीतून पुर्ननिर्माण केल्यास वाद टळणार आहे. त्यामुळे आयुक्त पवार यांचे पाऊल महत्वपुर्ण ठरणार आहे.

बातम्या आणखी आहेत...