आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्व आश्वासने पूर्ण करणार:नाशिक ते मुंबई फक्त 2 तासांत; रेकॉर्ड करून ठेवा माझे एकही आश्वासन खोटे ठरणार नाही -केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

नाशिक15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी आपल्या स्पष्ट बोलण्याच्या शैलीमुळे देशभरात ओळखले जातात. त्यांनी केलेल्या रस्ते आणि महामार्ग कामांची नेहमीच चर्चा होत असते. त्यातच गेल्या काही दिवसांपासून ते विविध शहरात होत असलेल्या कार्यक्रमांमध्ये विविध रस्ते आणि महामार्गांच्या विकासाची आश्वासने देत आहेत. काही लोक त्याचे तोंडभर कौतुक करत आहेत, तर काही लोकांना ती आश्वासने पूर्ण होतील का यावरच शंका आहे. त्यालाच नाशिकमध्ये बोलताना गडकरींनी उत्तर दिले आहे.

केंद्रीय मंत्री गडकरी नाशिकमध्ये होते. त्यांच्या हस्ते राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपुलासह तब्बल 2048 कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी बोलताना नितीन गडकरी म्हणाले, येत्या काळात तुम्हाला नाशिक ते मुंबईत अवघ्या 2 तासांमध्ये गाठता येईल. माझे बोलणे रेकॉर्ड करून ठेवा. मी दिलेले एकही आश्वासन खोटे ठरणार नाही. यासोबतच गडकरींनी इतरही अनेक महत्वाच्या घोषणा केल्या.

नितीन गडकरींनी यावेळी बोलताना नाशिकच्या उड्डाणपुलाच्या कंत्राटदारांचे कौतुकही केले. तसेच द्वारका पासून नाशिकरोड डबल डेकर उड्डाणपुलास मंजुरी दिली. यासाठी 1600 कोटी रुपयांचा खर्च येईल. नाशिक-मुंबई महामार्गावरील खड्ड्यांची दुरुस्ती, नाशिक-मुंबई महामार्गाचे 6 पदरीकरण, सिमेंट रस्त्यासाठीच्या कामाला 5000 कोटी रुपयांची मंजुरी देत असल्याची घोषणा सुद्धा केली. याच प्रकल्पामुळे येत्या काळात नाशिक ते मुंबईचे अंतर केवळ 2 तासात पूर्ण करता येईल असेही गडकरींनी आश्वस्त केले. वरळी-वांद्रे वसईपर्यंत जोडायचे होते, ते मला त्यावेळी शक्य झाले नाही. मात्र, नरिमन पॉईंट ते दिल्ली हे अंतर 12 तासांत गाठता यायला हवे हे करायचेच असल्याचे यावेळी गडकरी म्हणाले.

दरम्यान नाशिकचा विकास करताना अर्थकारणासह पर्यावरणाचाही विचार नक्कीच करा. शहर सुंदर आणि प्रदूषणविरहित असण्यासाठी त्यांनी काही उपाययोजना सुद्धा सांगितल्या. त्यामध्ये नाशिक शहरातील ट्रॅक टर्मिनल, कोल्ड स्टोरेज, गोडाऊन आणि ट्रकचे गॅरेज इत्यादी शहराबाहेर ठेवा. असतील तर स्थलांतरित करा जेणेकरून शहर सुंदर, स्वच्छ होईल आणि प्रदूषण सुद्धा कमी होईल असे आवाहन त्यांनी नाशिकच्या पुढाऱ्यांना केले आहे.

बातम्या आणखी आहेत...