आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या महापालिकेसाठी घरपट्टी सवलत योजना लॉटरी ठरली असून एप्रिल, मे आणि जूनच्या तीन आठवड्यात आतापर्यंत तब्बल ६७ कोटी १० लाखांची विक्रमी रक्कम जमा झाली आहे. गेल्या वर्षी याच पहिल्या तीन महिन्यांत जेमतेम २५ कोटी रुपये वसूल झाले असताना यंदा त्यात तुलनेत तब्बल ४२ कोटींची अधिक रक्कम तिजोरीत जमा झाली आहे.
कोरोनामुळे मागील दोन वर्षात घरपट्टी-पाणीपट्टीचा थकबाकीचा डोंगर ५०० कोटींपर्यंत पोहोचला होता. कोरोनाकाळात अनेकांचा रोजगार गेल्याने सक्तीने वसुली शक्य नव्हती. त्यामुळे थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्त करून लिलाव काढण्याची प्रक्रिया ठप्प झाली होती. ही बाब लक्षात घेत उत्पन्न वाढवण्यासाठी प्रशासक तथा आयुक्त रमेश पवार यांनी करसवलत योजना आणली आहे.
१ एप्रिलपासून सवलत योजनेला सुरुवात झाल्यानंतर आतापर्यत एक लाख ७७ हजार ८७२ मिळकतधारकांनी या योजनेचा लाभ घेतला असून ६७ कोटी १० लाखांची रक्कम जमा झाली आहे. करसवलत योजना लागू झाल्यानंतर म्हणजे २०१५ पासून प्रथमच पालिकेची विक्रमी करवसुली झाली आहे.
अशी आहे सवलत योजना
वार्षिक कराची संपूर्ण रक्कम एकरकमी भरल्यास एप्रिलमध्ये पाच टक्के, मे महिन्यात तीन टक्के तर जून महिन्यात दोन टक्के सवलत दिली जात आहे. त्याचबरोबर इ-पेमेंटद्वारे भरणा केल्यास अतिरिक्त एक टक्का व अधिकाधिक एक हजार रुपयांपर्यंत सवलत दिली जात आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.