आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायेथील मुंबई-आग्रा महामार्गालगत शहरातील नवीन बसस्थानकात लांब पल्ल्याच्या बसेस येत नसल्याने प्रवाशांना मुंबई-आग्रा महामार्गावर बसेससाठी प्रतीक्षा करण्याची वेळ आली आहे. २५ एप्रिलपासून केवळ दिवसभरात दहा ते बारा बसेस बसस्थानकात आल्याची नोंद झाली असल्याची धक्कादायक माहिती मिळाली. त्यामुळे बसस्थानक एक शोभेची वास्तू बनली आहे. दिशादर्शक फलक नसल्याने लांबपल्ल्यांच्या बसचा ओझरकरांना बाय-बाय केला जात आहे.
ओझर बसस्थानक लवकरात लवकर सुरू करावे, अशी मागणी प्रवाशांकडून वेळोवेळी करण्यात आली होती. नाशिकमार्गे मालेगाव, धुळे, जळगाव या लांब पल्ल्याच्या बसेस या स्थानकात येत नसल्याने तसेच या सर्व ठिकाणांहून नाशिककडे येणाऱ्या बसही हायवेने जाणार असून, त्यादेखील बसस्थानकात जात नाही त्यामुळे हे बसस्थानक केवळ शोभेची वास्तू आहे. पिंपळगाव, मनमाड, सटाणा, नांदगाव, मालेगाव, नाशिक १, नाशिक २, पेठ, इगतपुरी, सिन्नर, लासलगाव, कळवण, येवला आगारांच्या बस नवीन बसस्थानकात जातील. या गाड्या सर्व्हिस रोडने नाशिकमार्गे येवून बस स्थानकातून प्रवाशांना घेऊन एचएएल प्रवेश द्वारासमोरून जातात. एका बाजूच्या प्रवाशांची सोय झाली परंतु अजूनही ओझरहून या बसस्थानकातून नाशिककडे जाणाऱ्या प्रवाशांचा प्रश्न मात्र अधांतरीच आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.