आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाहिरात:मृद व जलसंधारण विभागात 670 पदांसाठी भरती, मार्चमध्ये परीक्षा

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शासनाच्या मृद व जलसंधारण विभागात ‘गट ब’ (अराजपत्रित) संवर्गातील ६७० पदांची सरळसेवेने भरती करण्यास शासनाच्या वतीने मान्यता देण्यात आली आहे. डिसेंबरमध्ये भरती प्रक्रियेची कार्यवाही सुरू होईल. ३१ डिसेंबरपूर्वी सविस्तर जाहिरात प्रसिद्ध होणार असून मार्च २०२३ मध्ये परीक्षा होईल.

या भरती प्रक्रियेसाठीच्या निवड समितीला ३१ डिसेंबरपूर्वी जाहिरात प्रसिद्ध करावी लागणार आहे. उमेदवारांचे अर्ज मागविणे, परीक्षेचे ओळखपत्र पाठविण्याची प्रक्रिया ३१ जानेवारीपर्यंत होईल. परीक्षेचा कालावधी १५ मार्च ते ३० एप्रिल असेल. निकाल व त्यानुसार निवड सूची १५ ते ३१ मे २०२३ पर्यंत होईल. तर निवड ालेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेश १ जून २०२३ पूर्वी द्यावे लागतील. ही भरती प्रक्रिया राबविण्यासाठी राज्य शासनाने सात सदस्यीय समिती स्थापली आहे. या समितीत नाशिकच्या जिल्हा जलसंधारण अधिकारी हरिभाऊ गिते यांचा समावेश आहे. समितीच्या अध्यक्षपदी औरंगाबादच्या मृद व जलसंधारण वाल्मीचे आयुक्त मधुकर अर्दंड तर सदस्यपदी पुण्याचे या विभागाचे अपर आयुक्त सु. पां. कुशिरे आहे.

बातम्या आणखी आहेत...