आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस काॅन्स्टेबलच्या जागांची भरती:पोलिस काॅन्स्टेबलच्या 7000 जागांची भरती;   15  सप्टेंबरपासून अर्जाची संधी

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र राज्य पोलिस काॅन्स्टेबलसाठी (शिपाई) भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असून ७ हजार २३१ जागा भरल्या जाणार आहेत. पोलिस भरतीची तयारी करू इच्छिणाऱ्या राज्यभरातील तरुणांसाठी भरती प्रक्रिया मोठी संधी आहे. १५ सप्टेंबरपासून अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे. बारावी उत्तीर्णांना अर्ज करता येईल. वयोमर्यादा १८ ते २८ वर्षे अशी आहे. पात्र उमेदवारांनी विहित मुदतीत अर्ज करावेत, असे आवाहन पोलिस विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांतील पोलिस काॅन्स्टेबलच्या जागांची भरती होणार आहे.

मुंबई पोलिस १४१३ जागा, ठाणे शहर पोलिस २३६, पुणे शहर १८२, पुणे ग्रामीण १५८, नागपूर ग्रामीण १०८, नागपूर शहर १५३, जळगाव १५४, सोलापूर ग्रामीण १४५, मीरा-भाईंदर ५०५, नवी मुंबई ३५८, मुंबई रेल्वे पोलिस ५०५, गडचिरोली ४१५, नांदेड १२८, अहमदनगर १३९, बुलढाणा ११७, पालघर ११५ अशा पद्धतीने जागांची भरती केली जाणार आहे. https://www.mahapolice.gov.in यावर अधिक माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...