आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेमुळे कोट्यावधी रुपयांच्या नवीन विकास कामांबरोबरच आरोग्य, वैद्यकीय आणि अग्निशामक विभागातील ७०६ पदांची भरती रखडण्याची भीती निर्माण झाली आहे. इन्स्टिट्यूट ऑफ बॅँकींग पर्सोनल सिलेक्शन अर्थात आयबीपीएसबराेबरील पुढील आठवड्यात सामंजस्य करार अपेक्षित असताना आता आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन घेतले जाणार आहे.
२४ वर्षापासून पालकेत भरती झालेली नाही. पालिकेचा आकृतिबंध ‘क’ वर्गानुसार मंजूर असून आस्थापना परिशिष्टावर ७०८२ पदे मंजूर असताना स्वेच्छानिवृत्ती, सेवानिवृत्ती व अन्य कारणांमुळे ४५०० इतकेच अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत. ही बाब लक्षात घेत ७०६ पदासाठीची सेवा प्रवेश नियमावली मंजूर केल्यामुळे याच पदांसाठी हाेणारी भरती आचारसंहितेमुळे रखडण्याची भीती निर्माण झाली आहे.
अभ्यास करून पुढील निर्णय घेणार पालिकेतील नोकरभरतीची प्रक्रिया राबविण्यासाठी आयबीपीएस संस्थेसमवेत सामंजस्य करार होणार आहे. मात्र, पदवीधर मतदारसंघ निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्याने नियमांचा अभ्यास करून पुढील निर्णय घेण्यात येईल. - मनोज घोडे पाटील, उपायुक्त(प्रशासन), मनपा.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.