आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Nashik
  • Recruitment Of 'C' And 'D' Category Posts In Healthcare Through Private Contractor, Process For 196 Posts Under First Deputy Director Of Health In Kolhapur.

दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह:आरोग्यसेवेतील ‘क’ व ‘ड’ श्रेणीतील पदांची भरती कंत्राटदारातर्फे, प्रथम कोल्हापुरात 196 पदांसाठी प्रक्रिया

नाशिक20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्य सरकारी कर्मचारी वर्गातील ‘क’ व ‘ड’श्रेणीतील पदांची भरती कायमस्वरूपी सेवेऐवजी आता थेट खासगी ठेकेदारामार्फत करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. प्रथम आरोग्यसेवेंतर्गत कोल्हापूर विभागात १९६ पदांची भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. दरम्यान, राज्यभरात याप्रमाणेच भरती प्रक्रिया राबवण्यासाठी शासन विचाराधीन असल्याचे सांगण्यात आले. नवी मुंबईतील डी. एम. एंटरप्रायजेस कंपनीला भरतीचे कंत्राटदेखील निविदा प्रक्रियेनुसार देण्यात आले आहे. आता आरोग्यसेवेतील वर्षानुवर्षे रिक्त पदे सरळसेवा भरतीतून स्पर्धा परीक्षेद्वारे न भरता थेट खासगी कंत्राटदारामार्फत मानधनावर भरण्यात येणार आहेत. आतापर्यंत शासकीय-निमशासकीय कार्यालयांमध्ये मानधनावरील पदे ही अकरा महिन्यांसाठी असायची. त्यानंतर ही पदे शासनस्तरावरच आवश्यकता असल्यास पुन्हा पुढील अकरा महिन्यांसाठी नियमित केली जात होती. परंतु, आता यासंबंंधित कंपनीच (ठेकेदार) आवश्यक ते मनुष्यबळ आरोग्य विभागाला उपलब्ध करून देणार आहे.

या रूग्णालयांसाठी प्रक्रिया : कोल्हापूर जिल्हा रुग्णालय - ८, सांगली जिल्हा रुग्णालय - १०, शिराळा उपजिल्हा रुग्णालय - १२, इचलकरंजी रुग्णालय - ८६ , महिला रुग्णालय रत्नागिरी - ४६, ट्रामा केअर सावंतवाडी - ४, कणकवली - ४, सिंधुदुर्ग महिला बालरुग्णालय - २३ १४ हजारापासून २८ हजारापर्यंत मानधन : या पदांसाठी शासनाने वेतनभत्ते ठरविताना मानधन निश्चित केले आहे. शिपाई, कक्षसेवक पदांना साधारणत: १३ हजार ते ३० हजारांपर्यंतचे मानधन आहे. आैषधनिर्माता पदासाठी १६ हजार ६००, कनिष्ठ लिपिक पदासाठी १५ हजार, अधिपरिचारिका २५ हजार, मनोविकृती सामाजिक कार्यकर्ते या पदासाठी २८ हजारांचे मानधन निश्चित करण्यात आले आहे.

‘या’ पदांची होणार भरती
आैषधनिर्माण अधिकारी, लघुटंकलेखक (मराठी), वाहनचालक, कनिष्ठ लिपिक, अधिपरिचारिका, शिपाई, बाह्यरुग्ण सेवक, व्रणाेपचारक, कक्षसेवक, शस्त्रक्रियागृह परिचर, समोपदेष्ठा, अभिलेखपाल, क्ष-किरण शास्त्रज्ञ, स्वच्छता निरीक्षक, रुग्णवाहिका चालक, लिफ्टमॅन, दूरध्वनीचालक, मदतनीसवर्ग, नळ कारागीर, न्हावी, अपघात विभाग सेवक, आयावर्ग, आहारतज्ज्ञ, रक्तपेढीतज्ज्ञ, प्रयोगशाळा तंज्ञत्र, ईसीजी तंत्रज्ञ, बालरोग परिचारिका, बाह्यरुग्ण लिपिक अशा कुशल व अकुशल पदे.

बातम्या आणखी आहेत...